'Forsa Goa' at the home of young footballers
'Forsa Goa' at the home of young footballers 
क्रीडा

फुटबॉलपटू प्रतेशसाठी नवी संधी

किशोर पेटकर

पणजी : गतमोसमात स्पर्धात्मक फुटबॉल मैदानापासून दूर राहिलेल्या गोव्याच्या प्रतेश शिरोडकर याला आगामी मोसमात नवी संधी प्राप्त झालीय. आय-लीग स्पर्धेतील संघ श्रीनगरच्या रियल काश्मीर संघात तो आता दिसेल.

गतमोसमात (२०१९-२०) प्रतेश एकही सामना खेळू शकला नाही. आयएसएल स्पर्धेतील संघ हैदराबाद एफसीसाठी चाचणी देत असताना त्याला इतर संघाकडून खेळण्याची संधी हुकली. त्यामुळे त्याला धेंपो स्पोर्टस क्लब संघातून सराव करावा लागला. त्यापूर्वी तो आयएसएल स्पर्धेत एफसी गोवा संघाकडून खेळला होता. ३१ वर्षीय प्रतेश मध्यफळीत अथवा बचावफळीत खेळतो. उंचीने कमी असला, तरी कळंगुटच्या हा खेळाडू परिणामकारक ठरतो.

प्रतेश वयाच्या १३व्या वर्षीपासून स्पर्धात्मक फुटबॉल खेळत आहे. गोवा युनायटेड स्पोर्टस अकादमीचे प्रतिनिधित्व केल्यानंतर तो २००७ मध्ये सेझा फुटबॉल अकादमीत रुजू झाला. तेथे तो पाच वर्षे होता. त्याअगोदर, शालेय पातळीवर तो कळंगुटच्या लिटल फ्लॉवर ऑफ जेझूस हायस्कूलतर्फे, तर राष्ट्रीय पातळीवर गोव्याकडून खेळला. २०१२ साली प्रतेशशी स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाने करार केला. २०१५ साली तो आयएसएल संघ मुंबई सिटी एफसीत दाखल झाला. वर्षभरानंतर त्याने एफसी गोवाशी करार केला. २०१७ मध्ये लोनवर आय-लीग संघ मुंबई एफसीकडून खेळला. २०१७-१८ मोसमापासून त्याला एफसी गोवाकडून प्रत्यक्ष मैदानावर खेळण्याची क्वचितच संधी लाभली. दोन मोसमात (२०१७-१८ व २०१८-१९) फक्त तो तीनच आयएसएल सामने खेळू शकला.

संपादन - तेजश्री कुंभार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva Teaser: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धुमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT