राष्ट्रीय सीनियर महिला फुटबॉल स्पर्धेची बाद फेरी गाठलेला गोव्याचा संघ
राष्ट्रीय सीनियर महिला फुटबॉल स्पर्धेची बाद फेरी गाठलेला गोव्याचा संघ Dainik Gomantak
क्रीडा

गोव्याच्या महिला बाद फेरीत

दैनिक गोमन्तक

पणजी: राष्ट्रीय सीनियर महिला फुटबॉल (football) स्पर्धेची बाद फेरी गाठताना गोव्याने ड गटात अव्वल स्थान मिळविले. शेवटच्या साखळी सामन्यात त्यांनी शुक्रवारी कर्नाटकावर 3-0 फरकाने मात केली. सामना केरळमधील कोझिकोड येथे झाला.

गोव्याचे बाद फेरीतील स्थान निश्चित करताना रेझिला सिया आल्मेदा हिने दोन गोल केले. तिने पहिला गोल 17 व्या, तर दुसरा गोल 26 व्या मिनिटास केला. त्यानंतर 40 व्या मिनिटास सुश्मिता जाधव हिने गोव्यासाठी तिसरा गोल नोंदविला.

'ड' गटातील अन्य एका लढतीत झारखंडने दिल्लीवर 2-1 फरकाने विजय नोंदविल्यामुळे गोव्याचे आगेकूच सूरळीत झाली. गोव्याने अपराजित राहताना तीन लढतीतून सात गुण नोंदविले. झारखंडचे तेवढ्याच लढतीतून सहा, तर दिल्लीचे चार गुण झाले. कर्नाटकला सर्व तिन्ही लढतीत पराभव पत्करला, त्यामुळे त्यांच्या खाती शून्य गुण राहिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dabolim Airport: भारतीय नौदलाच्या विमानाचे दाबोळीवर आपत्कालीन लँडिंग, चार फ्लाईट्स वळवल्या

Pernem News : पेडणे तालुक्यातील रस्त्यांची ‘वाट’; रस्ते पावसाळ्यापूर्वी तरी दुरुस्त होतील का

Goa Today's Live News: मडगाव येथे अपघातात एक ठार, एक जखमी

Bicholim Volleyball League : सर्वण येथे व्हॉलिबॉल लीगला सुरवात; आठ संघांचा सहभाग

Goa Traffic Violations: वाहतूक उल्लंघन ; चार महिन्यांत ९ कोटींचा दंड वसूल

SCROLL FOR NEXT