Goa Veterans
Goa Veterans  Dainik Gomantak
क्रीडा

Goa Football: गोवा वेटरन्सने मलेशियाला पराभवाचा धक्का देत जिंकले एशियन चॅम्पियनशिप

Pranali Kodre

Goa Veterans Football club: गोवा वेटरन्स फुटबॉल संघाने वावासन मलेशियाला पराभूत करत एशियन चॅम्पियनशीपचे विजेतेपद जिंकले आहे. गोवा वेटरन्सने मलेशियाला १-० अशा गोलफरकाने पराभूत केले आहे. ही स्पर्धा बंगळुरु वेटरन्स कोचिंग आणि रिक्रिएशन सेंटरकडून आयोजित करण्यात आली होती.

कर्नाटकमधील ड्रिस्ट्रिक्ट फुटबॉल ग्राऊंडवर आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत गोवा वेटरन्स, वावासन मलेशिया यांच्याशिवाय बीव्हीसी अँड आरसी बेंगळुरू, इंडो-फ्रेंच वेटरन्स पाँडिचेरी, किक फुटबॉल ऍकेडमी चेन्नई आणि टायगर वेटरन्स कन्नूर केरळ हे संघही सहभागी झाले होते.

दरम्यान, गोवा वेटरन्स आणि वावासन मलेशिया यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात निक्लाओ बोर्जेसने गोव्याकडून एकमेव गोल नोंदवला.

गोवा वेटरन्सने यापूर्वी उपांत्य फेरीत रॉयल टायगर वेटरन्स केरळ संघाला ३-० अशा फरकाने पराभूत केले होते. या सामन्यात निक्लाओ बोर्जेस, सेबी वाझ, जोसोरोसे ओलीवेरो यांनी गोल नोंदवले होते.

ही स्पर्धा आता संपली असून या स्पर्धेतील सर्वोत्तम गोलकिपरचा पुरस्कार कॅमिलो बारेटोला देण्यात आला.

या स्पर्धेत गोवा वेटरन्स संघाचे प्रशिक्षकपद लुईस वास यांच्याकडे होते, तसेच मनोज नाईक केनी संघाचे मॅनेजर होते. गोव्याच्या संघात पास्कोल फर्नांडिज, जोसोरोसे ओलीवेरो, व्हिन्सेंट कोलाको, रेमी कोलाको, सँटन कोलाको, कॅमिलो बारेटो, एडिथ फर्नांडिस, विटोरिन कोलाको, रमेश पालकर, निक्लाओ बोर्जेस, मेलविन फर्नांडिस, सेबी वाझ, बेनेडिक्ट फर्नांडिस, सँटन कोलाको (ज्यूनियर) या खेळाडूंचा समावेश होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT