<div class="paragraphs"><p>Goa</p></div>

Goa

 

Dainik Gomantak 

क्रीडा

कुचबिहार करंडक स्पर्धेत गोव्याच्या मोहिमेची अखेर पराभवानेच !

किशोर पेटकर

पणजी ः कुचबिहार करंडक 19 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेच्या एलिट क गटातील गोव्याच्या मोहिमेची अखेरही पराभवानेच झाली. सलग पाचव्या लढतीत त्यांच्यावर डावाने हार स्वीकारण्याची नामुष्की आली. सूरत येथील सी. के. पिठावाला मैदानावर झालेल्या चार दिवसीय लढतीत मध्य प्रदेशने (madhya pradesh) बुधवारी तिसऱ्याच दिवशी डाव व 74 धावांनी दणदणीत विजय मिळवून सात गुणांची कमाई केली. गोव्याला (Goa) गटात एकही गुण प्राप्त करता आला नाही.

फॉलोऑननंतर गोव्याचा दुसरा डाव बुधवारी 83.4 षटकांत 249 धावांत आटोपला. प्रमुख फलंदाजांनी जम बसत असताना बाद होण्यावर भर दिल्यामुळे गोव्याला दुसऱ्या डावातही प्रतिकार करता आला नाही. पहिल्या डावात 170 धावांत गारद झालेल्या गोव्याला दुसऱ्या डावात अडीचशे धावांच्या जवळ जाता आले एवढेच समाधान लाभले. उदित यादव (66) व दीप कसवणकर (35) यांनी सातव्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केल्यामुळे गोव्याला धावफलकावर द्विशतक ओलांडता आले. त्यापूर्वी कर्णधार कौशल हट्टंगडी (26) व आयुष वेर्लेकर (24) यांनी पाचव्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी केली होती. त्यामुळे 4 बाद 80 वरून गोव्याने शतक पार केले.

संक्षिप्त धावफलक

मध्य प्रदेश, पहिला डाव ः ९ बाद ४९३ घोषित वि. वि. गोवा, पहिला डाव ः १७० व दुसरा डाव ः ८३.४ षटकांत सर्वबाद २४९ (वीर यादव ०, आर्यन नार्वेकर २१, जुनेद सय्यद ३५, शिवेंद्र भुजबळ १९, कौशल हट्टंगडी २६, आयुष वेर्लेकर २४, उदित यादव ६६- १०४ चेंडू, ७ चौकार, ३ षटकार, दीप कसवणकर ३५, मनीष काकोडे १८, लखमेश पावणे नाबाद ०, फरदीन खान ०, आर्यन पांडे २५-३, युवराज नेमा ११३-३)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT