गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत सोमवारी धेंपो स्पोर्टस क्लब व चर्चिल ब्रदर्स यांच्यात झालेल्या लढतीत हेडिंग साधण्याच्या प्रयत्नात खेळाडू
गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत सोमवारी धेंपो स्पोर्टस क्लब व चर्चिल ब्रदर्स यांच्यात झालेल्या लढतीत हेडिंग साधण्याच्या प्रयत्नात खेळाडू Dainik Gomantak
क्रीडा

धेंपो क्लबची चर्चिल ब्रदर्सशी गोलशून्य बरोबरी

Dainik Gomantak

Goa Football: गोल करण्याच्या संधी गमावल्यामुळे गोवा प्रोफेशनल लीग (Goa Professional League) फुटबॉल स्पर्धेत धेंपो स्पोर्टस क्लब व चर्चिल ब्रदर्स संघाला गोलशून्य बरोबरीमुळे प्रत्येकी एका गुणावर समाधान मानावे लागले. सामना सोमवारी म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला.

दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी प्रयत्न केले, पण त्यात यश आले नाही. पूर्वार्धातील खेळात चर्चिल ब्रदर्सच्या क्युआन गोम्स याने बॉक्सबाहेरून मारलेल्या सणसणीत फ्रीकिक फटक्याने धेंपो क्लबच्या खेळाडूंच्या भिंतीला व गोलरक्षकास चकविले होते, परंतु चेंडू गोलपट्टीस आपल्यामुळे चर्चिल ब्रदर्सच्या पदरी निराशा आली. त्यानंतर सूरज हडकोणकर याच्या फ्रीकिकवर एडविन व्हिएगसने हेडिंग साधले, परंतु चेंडू गोलपट्टीवर गेला, तसेच खेळाडू ऑफसाईड होता, त्यामुळे धेंपो क्लबला फायदा झाला नाही.

सामन्याच्या ५२व्या मिनिटास धेंपो क्लबला आघाडीची सुवर्णसंधी होती, परंतु अमन गोवेकर ऐनवेळी गडबडला. त्यानंतर विनिल पुजारीचा ताकदवान फटका धेंपो क्लबचा गोलरक्षक डायलन डिसिल्वा याने योग्यपणे अडविल्यामुळे चर्चिल ब्रदर्सला गोलविना राहावे लागले. ७०व्या मिनिटास सूरज हडकोणकरच्या क्रॉसपासवर समोर केवळ गोलरक्षक असताना बदली खेळाडू व्हेलान्सो रॉड्रिग्ज याला अचूक नेम साधता आला नाही, त्यामुळे धेंपो क्लबला निराशा झेलावी लागली. सामन्यातील सहा मिनिटे बाकी असताना धेंपोच्या नेसिया फर्नांडिसला नशिबाची साथ लाभली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: पणजीच्या पोटात दडलंय तरी काय? खोदकामात सापडली आणखी एक रहस्यमय मूर्ती

Goa Congress : निष्ठावंत कार्यकर्ते, प्रतिनिधींची वानवा; काँग्रेसची मोठी पंचाईत

Bicholim News : गोव्याच्या अस्तित्वासाठी झटणार : ॲड. रमाकांत खलप

Karnataka Sex Scandal Case : कर्नाटकातील सेक्स स्कँडल प्रकरणाचा गोव्यावर परिणाम नाही : सदानंद तानावडे

Goa Today's Live News: इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर किमान 10-15 राज्यातील सरकार कोसळतील - पवन खेरा

SCROLL FOR NEXT