कोल्हापूरचे माजी कसोटीपटू एस. आर. पाटील यांचे निधन
कोल्हापूरचे माजी कसोटीपटू एस. आर. पाटील यांचे निधन 
क्रीडा

कोल्हापूरचे माजी कसोटीपटू एस. आर. पाटील यांचे निधन

क्रीडा प्रतिनिधी

कोल्हापूर: ज्येष्ठ माजी कसोटीपटू व महाराष्ट्र क्रिकेट संघाचे कर्णधार एस. आर. पाटील (वय ८७, रा. रुईकर कॉलनी) यांचे आज पहाटे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. इंग्लंडमधील क्‍लबकडून खेळताना त्यांनी तीनदा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान मिळविला होता. तसेच तेथील माध्यमांनी त्यांची दखल घेत प्रसिद्धी दिली होती. 

श्री. पाटील मूळचे कसबा ठाणे (ता. पन्हाळा) येथील. त्यांचा १० ऑक्‍टोबर १९३३ ला जन्म झाला. वडील रावजी पाटील यांना मुलाने क्रिकेटमध्ये कोल्हापूरचे नाव उंचवावे, अशी इच्छा होती. श्री. पाटील यांनी वडिलांच्या इच्छेसाठी क्रिकेटचा कसून सराव केला. त्यांचे न्यू हायस्कूलमधून शालेय शिक्षण झाले. ते इंग्लंडमधील लंकेशायर, नॉर्थस्टॅण्पोर्डशायर व नॅन्टविच क्‍लबकडून खेळले. क्‍लबकडून खेळताना त्यांची आकडेवारी थक्क करणारी ठरली. इंग्लंडमधील माध्यमांनी त्याची दखल घेत त्याला प्रसिद्धी दिली. इंग्लंडमध्ये त्यांनी तीनदा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान मिळवला. तसेच उत्कृष्ट व्यावसायिक खेळाडू म्हणून त्यांची कारकीर्द प्रभावी ठरली. न्यूझीलंडविरुद्धच्या एकमेव कसोटीत त्यांची निवड झाली होती. कर्णधार पॉली उम्रीगर यांच्या नेतृत्वाखाली ही कसोटी भारतीय संघाने जिंकली. प्रथम श्रेणीच्या सामन्यातही त्यांनी अष्टपैलू खेळ केला. 

१९५२ ते १९६४ दरम्यान ते महाराष्ट्र संघाकडून खेळले. त्यात त्यांनी ३६ सामन्यात तीन अर्धशतकांसह ८६६ धावा केल्या. गोलंदाजीत ३०.६६ सरासरीने ८३ गडी बाद करत वेगळा ठसा उमटवला.

जे. आर. डी. टाटांचा मिळवला होता विश्वास
श्री. पाटील जे. आर. डी. टाटा यांच्या स्वदेशी मिलमध्ये ३६ वर्षे कार्यरत होते. जे. आर. डी. टाटा यांचा त्यांच्या गोलंदाजीवर जबरदस्त आत्मविश्‍वास होता. त्यांना श्रीमंत छत्रपती शहाजी महाराज यांचे प्रोत्साहन, तर जतचे राजे डफळे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले. क्रिकेट वर्तुळात डी. आर. पाटील, एम. आर. पाटील यांनी चमकदार कामगिरी केली. त्यांचे हे बंधू होत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

Air India Express: एअर इंडिया एक्सप्रेसची गोव्याला येणारी फ्लाईट रद्द, दिल्ली विमानतळावर प्रवाशांचा गोंधळ Video

SCROLL FOR NEXT