rashia.jpg
rashia.jpg 
क्रीडा

Euro Cup 2020: फिनलॅंडला नमवत रशियाने स्पर्धेतील आव्हान कायम राखलं

गोमंन्तक वृत्तसेवा

2020 युरो कप (Euro Cup 2020) स्पर्धेतील फिनलॅंड(finland) विरुध्द रशिया (Russia) सामन्यामध्ये रशियाने बाजी मारली. फिनलॅंडचा रशियाने 1-0 ने पराभव केला. या विजयासह रशियाने या स्पर्धेमधील आपलं आव्हान कायम ठेवलं आहे. या सामन्यामध्ये एकूण वेळेचा विचाहर करता रशियाने 59 टक्के अर्थात 580 वेळा फुटबॉल पास करत आपल्या कब्जात ठेवला होता. तर दुसरीकडे फिनलॅंडने 41 टक्के अर्थात 404 वेळा पास करत फुटबॉल (Football) आपल्या ताब्यामध्ये ठेवला होता. या रंगतदार सामन्यात रशियाला 4 तर फिनलॅंडला १ कॉर्नर मिळाले. यात एकदा टार्गेटवर स्ट्राईक करण्यात फिनलॅंड यशस्वी ठरला. मात्र रशियच्या गोलकिपरने त्यांचा गोल अडवला. रशियाने या विजयाबरोबर ब गटातील गुणतालिकेमध्ये दुसरे स्थान गाठले आहे. तर या गटामध्ये बेल्जियमचा संघ पहिल्या स्थानी आहे. तर आजच्या पराभवामुळे फिनलॅंड तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. डेन्मार्क(Denmark) चौथ्या स्थानावर आहे. 22 जून रोजी रशियाचा पुढील सामना डेन्मार्क बरोबर आहे. तर दुसरीकडे बलाढ्य अशा बेल्जिअमचा(Belgium) फिनलॅंडला 22 जून रोजी सामना करावा लागणार आहे. 

रशियाने पहिल्या सत्रामध्ये गोल केल्याने फिनलॅंड संघाला दडपणाखाली आणले. एलेक्से मिरानच्युकने (Alexei Miranchuk) गोल झळकावला. त्यानंतर फिनलॅंडच्या संघाची दुसऱ्या सत्रात बरोबरी साधण्यासाठी धडपड सुरु होती. मात्र त्यांच्या संघाला अपयश आले. या पराभवामुळे फिनलॅंडच बाद फेरीमध्ये जाण्याचं आव्हान खडतर झाले आहे. आता पुढील सामन्यामध्ये फिनलॅंडला मोठ्या फरकाने सामना जिंकावा लागणार आहे. रशियाचे पहिल्या सत्रामध्ये दोन, तर फिनलॅंडच्या एका खेळाडूला पिवळं कार्ड दाखवण्यात आलं.

फिनलॅंडने सामन्यात 3-5-2 अशी आपली रणनिती आखली होती. तर 4-3-3 अशी व्यहरचना आखत रशिया मैदानामध्ये उतरला होता. आतापर्यंत दोन्हीही संघाचे पाच सामने पार पडले आहेत. विशेष म्हणजे हे पाचही सामने रशियाने जिंकले आहेत. रशियाने चार सामन्यात 16 तर फिनलॅंडने 1 गोल केला आहे. किम सोमिनेन यांनी फिनलॅंडसाठी एकमेव गोल 1995 साली केला होता. फिनलॅंडला रशियाने ऑगस्ट 1995 मध्ये 6-0 पराजीत केले होते.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT