MS Dhoni |IPL 2023
MS Dhoni |IPL 2023 Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023 मध्ये चेन्नईची धुरा पुन्हा माहीकडे, CSKकडून शिक्कामोर्तब

दैनिक गोमन्तक

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. चेन्नई सुपर किंग्ज (CSK)च्या कर्णधारपदी पुन्हा महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) विराजमान होणार आहे. दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला धोनी सध्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) खेळत आहे. धोनी पुढच्या सत्रातही खेळणार की नाही, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात असेल. मात्र धोनी पुढची आयपीएल केवळ खेळणारच नाही तर तो चेन्नईच्या संघाचं नेतृत्व देखील करणार आहे.

चेन्नई संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना विश्वनाथन यांनी सांगितले की, 'महेंद्रसिंह धोनी पुढील आयपीएल हंगामात चेन्नई संघाचा कर्णधार असेल. या निर्णयामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असंही त्यांनी सांगितले. गेल्या मोसमात रवींद्र जाडेजाकडे कर्णधारपद सोपवण्यात आले होते.

धोनीने संघाला सर्वाधिक 4 वेळा विजेतेपद मिळवून दिले

2008 साली आयपीएल (IPL) सुरू झाले. तेव्हापासून धोनी चेन्नई संघाचे कर्णधारपद सांभाळत आहे. त्याने संघाला सर्वाधिक 4 वेळा विजेतेपद मिळवून दिले आहे. गेल्या म्हणजेच आयपीएल 2022 च्या मोसमात चेन्नई फ्रँचायझीने काही बदल केले होते. फ्रँचायझीने प्रथमच धोनीला कर्णधारपदावरून हटवले होते. धोनीने स्वत: रवींद्र जडेजाकडे कर्णधारपद सोपवले होते. पण या सिझनला संघाची कामगिरी अत्यंत खराब राहिली होती.

खराब कामगिरीनंतर जडेजाने मध्येच कर्णधारपद सोडले होते. जडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघाने सुरुवातीच्या 8 सामन्यांपैकी केवळ 2 सामने जिंकले होते. त्याचवेळी जाडेजाच्या कामगिरीवरही परिणाम झाला होता. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीत तो फ्लॉप दिसत होता. त्यानंतर स्वतः जाडेजाने कर्णधारपदाचा राजीनामा देत पुन्हा धोनीकडे नेतृत्व सोपवले. मात्र तरीही चेन्नईचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

PM Modi In Goa : जल्लोषी माहोल अन्‌ मोदी करिष्म्याची जादू; गोव्यातील सभेला नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद

SCROLL FOR NEXT