David Warner And Mitchell Marsh  Dainik Gomantak
क्रीडा

Aus vs Pak: वॉर्नर-मार्शचा बंगळूरुमध्ये जलवा, शतके झळकावून रचला मोठा इतिहास; पाकिस्तानी गोलंदाजांवर बरसले!

Manish Jadhav

World Cup 2023 Aus vs Pak: एकदिवसीय विश्वचषक 2023 चा 18 वा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाकिस्तान यांच्यात खेळला जात आहे. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.

ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी दमदार शतके झळकावली. या शतकांमुळे त्यांनी ऑस्ट्रेलियासाठी इतिहास रचला. विश्वचषकाच्या इतिहासात कांगारु संघाच्या दोन्ही सलामीवीरांनी शतकी खेळी खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

दरम्यान, विश्वचषकाच्या (World Cup) इतिहासात एका संघाच्या दोन्ही सलामीच्या फलंदाजांनी शतके ठोकण्याची ही चौथी वेळ आहे. याची सुरुवात 2011 मध्ये झाली, जेव्हा तिलकरत्ने दिलशान आणि उपल थरंगा यांनी झिम्बाब्वे आणि केनियाविरुद्ध दोनदा शतके झळकावली होती.

त्याचवेळी, 2019 मध्ये केएल राहुल आणि रोहित शर्मा या सलामीवीरांनी भारतासाठी हा पराक्रम केला होता. या दोघांनी श्रीलंकेविरुद्ध सलामीवीर म्हणून शतकी खेळी खेळली होती.

दोन्ही सलामीवीरांनी विश्वचषकात शतके झळकावली

2011 मध्ये श्रीलंका (दिलशान - 144 आणि थरंगा - 133) विरुद्ध झिम्बाब्वे

2011 मध्ये श्रीलंका (दिलशान - 108* आणि थरंगा - 102*) विरुद्ध केनिया

2019 मध्ये भारत (केएल राहुल - 111 आणि रोहित - 103) विरुद्ध श्रीलंका

2023 ऑस्ट्रेलिया (मार्श - 108* आणि वॉर्नर - 101*) विरुद्ध पाकिस्तान

दुसरीकडे, डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि मिचेल मार्श यांनी पाकिस्तानविरुद्ध सुरुवातीला फारसे आकर्षक शॉट्स खेळले नाहीत, पण काही षटके खेळून स्थिरावल्यावर धावांचा पाऊस पाडला. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 33.5 षटकांत 259 धावांची भागीदारी झाली.

यादरम्यान मिचेल मार्श 108 चेंडूत 121 धावांची इनिंग खेळून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 10 चौकार आणि 9 षटकार मारले. डेव्हिड वॉर्नरने 111 चेंडूत 13 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 139 धावा केल्यानंतर नाबाद राहिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT