चेन्नईचा संघ कोरोना हॉटस्पॉट? 
क्रीडा

आयपीएल २०२०: चेन्नई सुपर किंग्जचा संघ कोरोना हॉटस्पॉट?

वृत्तसंस्था

दुबई: आयपीएलची लगबल सुरू होत असताना काल संघातील १३ सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याच्या वृत्ताने चेन्नई सुपर किंग्ज संघ हादरला होता; त्यात आज त्यांना आणखी मोठा धक्का बसला. महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत कधी कधी नेतृत्व केलेल्या अनुभवी सुरेश रैनाने वैयक्तिक कारणास्तव या आयपीएलमधून मघार घेतली आहे. तातडीने तो माघारी परतणार आहे. त्यातच ऋतुराज गायकवाड हा खेळाडूही कोरोनाबाधित झाल्याचे निदान झाले.

तीन वेळा विजेतेपद आणि गतवर्षी उपविजेतेपद मिळवणाऱ्या चेन्नई संघावर सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणारा धोनी या आयपीएलमध्ये कशी कामगिरी करतो याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून राहिलेले असताना चेन्नईच्या संघाला एकामागोमाग एक धक्के बसले आहेत.

रैनाने केला होता कसून सराव
धोनीबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली असली तरी रैना आयपीएलसाठी फार मेहनत घेत होता. लॉकडाऊनमध्येही उत्तर प्रदेशातील निवासस्थानाजवळ तो सराव करत होता. तसेच दुबईला प्रयाण करण्यापूर्वी चेन्नईतही त्याने कसून सराव केला होता; मात्र आयपीएलसाठी सज्ज होण्याची वेळ आली असताना त्याने वैयक्तिक कारण देत माघार घेतली. दरम्यान, काल प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार चेन्नई संघातील १२ सपोर्ट स्टाफ आणि एक खेळाडू कोरोनाबाधिक झाला होता, परंतु ११ सपोर्ट स्टाफ आणि एक खेळाडू (दीपक चहर) असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

१,९८८ चाचण्या
सर्व आठही संघ अमिरातीत दाखल झाल्यानंतर २० ते २८ ऑगस्टदरम्यान १,९८८ आरटीपीसीआर कोव्हिड चाचण्या करण्यात आल्याची माहिती बीसीसीआयने दिली. त्यातून दोन खेळाडूंना कोरोना झाल्याचे नमूद करण्यात आले. बाधितांच्या संपर्कात आलेल्या कोणालाही लक्षणे दिसून आलेली नाहीत, परंतु या बाधितांचे विलगीकरण करण्यात आले आहे, असेही बीसीसीआयने कळवले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

KL Rahul Century: लॉर्ड्सच्या मैदानावर राहुलची बादशाही, आशियात कुणालाच जमलं नाही ते करुन दाखवलं

Goa Tourism: पावसाळ्यातही गोव्यातील पर्यटन फुल्ल; बीचवर पर्यटकांची गर्दी

प्रेमात धोका दिलेल्या व्यक्तीला पुन्हा जवळ करावं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं रंजक उत्तर; म्हणले...

Joe Root Record: क्रिकेटच्या देवाचा कसोटीतील महान विक्रम धोक्यात, जो रूट करणार राडा? आहे इतिहास रचण्याची संधी...

Viral Video: तुमच्या पाया पडतो! भाजप नेत्याचे स्मशानभूमीत अश्लील उद्योग, विवाहित महिलेसोबत रेड हँड सापडला

SCROLL FOR NEXT