Arjun Tendulkar
Arjun Tendulkar Dainik Gomantak
क्रीडा

Arjun Tendulkar : पाहुण्या फलंदाजाच्या शोधात गोवा

Kishor Petkar

पणजी : गोवा क्रिकेट असोसिएशनने (जीसीए) आगामी देशांतर्गत सीनियर क्रिकेट मोसमासाठी दोघा व्यावसायिक (पाहुणे) क्रिकेटपटूंना जवळपास निश्चित केले आहे, आता संघातील निव्वळ फलंदाजाचा शोध असून अर्ज आलेल्या खेळाडूंतील पाचपैकी एकाची निवड होईल.

‘‘आम्हाला तरुण डावखुरा वेगवान गोलंदाज हवा आहे. सध्या या गटात फक्त अर्जुन तेंडुलकर एकमेव आहे. गतमोसमात मुंबईचा एकनाथ केरकर संघातील मुख्य यष्टिरक्षक होता. त्याने रणजी स्पर्धेत उपयुक्त योगदान दिले, तसेच संघात दोन यष्टिरक्षक हवे असल्याने अजून आम्ही एकनाथला मुक्त केलेले नाही.आता निव्वळ फलंदाज असलेल्या व्यावसायिक क्रिकेटपटूच्या शोधात आहोत,’’ असे जीसीए सचिव विपुल फडके यांनी शनिवारी सांगितले.

पाहुणा फलंदाज या नात्याने जीसीएकडे पंजाबचा जीवनज्योत सिंग, मुंबईचा सिद्धेश लाड, दिल्लीचा वैभव रावळ, दिल्लीचा, पण गतमोसमात अरुणाचलतर्फे फक्त एक टी-२० सामना खेळलेला अंकित सिंग यांचे अर्ज आले आहेत.

झारखंडचा कुमार देवब्रत यानेही गोव्याकडून खेळण्यासाठी इच्छुक असल्याचे कळविले आहे. हे सारे खेळाडू दिल्लीतील सराव शिबिरात भाग घेतील. जीसीएने गतमोसमातील पाहुणे क्रिकेटपटू शुभम रांजणे व श्रीकांत वाघ यांना आणखी करारवाढ न देण्याचे ठरविले आहे.

संभाव्य संघ 27 सदस्यीय

ऑगस्ट महिन्याच्या उत्तरार्धात गोव्याचा सीनियर क्रिकेट संघ मोसमपूर्व सरावासाठी दिल्ली येथे जाईल. नंतर संघ पंजाबमध्ये होणाऱ्या जे. पी. अत्रेय करंडक एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेत खेळेल.

सीनियर संघाची जबाबदारी सध्या माजी रणजी प्रशिक्षक राजेश कामत यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. दिल्लीस सरावात जाणाऱ्या संभाव्य संघात २७ खेळाडू स्थानिक असतील. इच्छुक पाहुणे क्रिकेटपटू दिल्लीतील शिबिरात दाखल होतील, अशी माहिती विपुल यांनी दिली.

अर्जुनचा पर्वरी मैदानावर सराव

महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर गोव्यातर्फे आगामी मोसमात तिन्ही प्रकारच्या स्पर्धांत खेळणार हे शनिवारी निश्चित झाले. डावखुरा वेगवान गोलंदाज असलेल्या 22 वर्षीय अर्जुन गोव्यात आला आहे.

त्याने शनिवारी पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर वार्मअप, तसेच गोलंदाजी सराव केला. यावेळी जीसीए संबंधितांची भेट घेऊन चर्चाही केली. जीसीएशी करार करण्यासाठी तो गोव्यात आल्याचे समजते. त्याला नव्या संघाशी करार करण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने ना हरकत दाखला (एनओसी) दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT