Covid Care |yoga  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Yoga Tips For Women: तुम्हालाही राहायचं फिट? नियमित करा हे योगासनं

महिलांनी शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी नियमित योगा करावा.

दैनिक गोमन्तक

Yoga Tips For Women's Health Lifestyle: महिलांनी निरोगी आरोग्यासाठी नियमित योगा करणे फायदेशीर असते. मासिक पाळी, गर्भधारणा, रजोनिवृत्ती म्हणजेच मेनोपॉज यासारखे बदल शरीरातील इतर अनेक बदलांचे कारण होतात.

त्यामुळे शरीरात स्टॅमिना कमी होणे, हाडे कमजोर होणे, पाठदुखी, पाय दुखणे आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. अशावेळी महिलांसाठी योगा करणे खूप महत्त्वाचे आहे. या बदलांशी लढण्यासाठी योगामुळे (Yoga) महिलांचे शरीर मजबूत होते.

यासोबतच इतर आजारांवरही ते फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणती आसने जी महिलांसाठी फायदेशीर ठरतात.

  • बद्धकोनासन

हा योगा केल्याने तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटेल. यासाठी सर्वात पहिले जमिनीवर बसावे. दोन्ही पाय गुडघ्यापासून वाकवून, पायाची बोटे एकत्र जोडावीत.

मग फुलपाखराच्या पंखाप्रमाणे पाय वर खाली हलवा. गुडघ्यांच्या स्नायूंना आराम मिळतो.

Baddha Konasana
  • परिव्रत सुखासन

हा योग प्रकार केल्याने महिलांना खांदे आणि मणक्याची समस्या उद्भवणार नाही. त्यामुळे पाठदुखीपासून आराम मिळतो. यासोबतच हे पोटाचे अवयव तंदुरुस्त ठेवण्यासही मदत करते.

हे करण्यासाठी, जमिनीवर बसा आणि खांद्याच्या बाजूने मागे वाकून घ्या. ही आसने शरीरातील लवचिकता वाढवण्यास मदत करतात.

परिव्रत सुखासन
  • नौकासन

नौकासन करण्यासाठी योगा मॅटवर बसावे. नंतर पाय हवेत वर करा आणि 45 अंशांचा कोन करून दीर्घश्वास घ्या.

हे आसन केल्याने पाय आणि हातांचे स्नायू कमी होण्यास मदत होते. तसेच पोटाची लटकलेली चरबी त्याच्या मदतीने घट्ट करता येते.

नौकासन
  • वृक्षासन

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच वृक्षासन करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यासाठी उजव्या पायावर उभे राहून डावा पाय उजव्या पायाच्या गुडघ्या जवळ ठेवा. नंतर हात वर करून नमस्कारची मुद्रा करा. दीर्घश्वास घ्या आणि सोडा.

हा योगा केल्याने मानसिक तणाव तर दूर होतोच पण शरीराचा समतोल राखण्यासही मदत होते. हे आसन केल्याने पायातील सायटिका दुखण्यात आराम मिळतो आणि तुमचे पायही मजबूत होतात.

वृक्षासन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Khanapur Elephant Death: संतापजनक! खानापुरात विजेचा शॉक लागून 2 हत्ती ठार, झटका मशीनला वीजवाहिनी जोडल्याने दुर्घटना

Polem Loliem: 4 वर्षांच्या बालकाला अमानुष मारहाण, आईच्या अटकेसाठी पोळेवासीय एकवटले; मानवी तस्करीचा प्रकार उघडकीस

Horoscope: अनपेक्षित घटना फायदेशीर, आर्थिक लाभाची शक्यता; संयम ठेवा!

IND vs SA Final 2025: हरमनची टीम इंडिया बनली 'वर्ल्डकप चॅम्पियन'; वुल्फर्टची झुंजार शतकी खेळी ठरली व्यर्थ; दिप्ती शर्माच्या भेदक माऱ्याने केली कमाल! VIDEO

India vs Australia: चौथ्या टी-20 सामन्यापूर्वी टीम इंडियाला बसला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू अचानक मायदेशी, काय कारण?

SCROLL FOR NEXT