Vastu Tips For New Home: एखादी व्यक्ती आनंदी आणि शांत जीवन जगण्यासाठी घर बांधतात. पण नवीन घरात राहायला गेल्यावर त्याच्या कामात अडचणी येऊ लागतात आणि हळूहळू शांतता नाहीशी होऊ लागते. त्यामुळे त्या व्यक्तीच्या मनात विचार येऊ लागतात की नव्यापेक्षा जुने घर चांगले होते. जर तुम्ही नवीन घरात प्रवेश करताच, नोकरीत प्रगती होत नसेल, कुटुंबातील सदस्यांची तब्येत खराब होत असेल, सर्वजण अचानक चिडचिड करत असेल तुमच्या नवीन घरात काही वास्तुदोष आहे हे समजावे. वास्तुदोष दूर करण्यासाठी काय करावे हे जाणून घेऊया.
वास्तू दोष टाळण्यासाठी पुढिल उपाय करावे
गुळाचा वापर
नवीन घरात आल्यानंतर जर कुटुंबातील कोणी आजारी पडू लागले तर जेवल्यानंतर गुळाचा वापर करावा.
पिवळे पडदे
नवीन घरात येताच सर्व काही बिघडत असेल, तर संपूर्ण घरात पिवळे पडदे लावावे. नव्या घरात हळदीचे पाणी घरात शिंपडावे. जेणेकरून गुरुच्या आशीर्वादाने घर आणि कुटुंबाची भरभराट होईल.
हिरवे धणे
नवीन घरात आल्यावर जर तुम्हाला झोप येत नसेल तर हळदीचे पाच तुकडे पिवळ्या कपड्यात बांधून जोपताना उशीजवळ ठेवावे. यामुळे झोपेची समस्या कमी होईल.
पिंपळाचे झाड
नवीन घरात जाताच नोकरीत प्रगती होत नसेल तर मोहरीचे तेल दान करावे आणि शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ तेलाचा दिवा लावा.
पांढरा तांदुळ
जर नव्या घरामध्ये हवा खेळती नसेल तर घरात गुदमरल्यासारखे वाटते. यामुळे वास्तु दोष निर्माण होऊ शकतो. हे टाळण्यासाठी पांढरा तांदूळ, कापूर इत्यादी पांढर्या वस्तूंचे दान करावे.
मसुरचा उपाय
सकाळी सूर्यप्रकाश घरात येणं खूप गरजेचं आहे. जर घरात अंधार येत असेल तर तो देखील दोषाच्या श्रेणीत येतो आणि दुर्दैव, रोग आणि दुःख निर्माण करतो. प्रतिबंधासाठी रात्री लाल मसूर घराभोवती पसरवा आणि सकाळी बाहेर फेकून द्यावा.
सुर्य यंत्र
जर तुमची मुले तुमचे ऐकत नसतील किंवा अभ्यास करत नसतील तर तुमच्या घराच्या मुख्यद्वारावर तांब्यावर बनवलेले सूर्य यंत्र स्थापित करावे. तसेच तुमच्या पूजेच्या ठिकाणी सूर्य यंत्र स्थापित करा आणि त्याची पूजा करा.
ताब्याचे नाणे
नवीन घरात गेल्यावर कारण नसताना नातेवाइकांसोबत वाद होत असेल तर तांब्याचे नाणे दान करावे. यामुळे वाद कमी होतील.
नवीन घरात सुख-शांती भंग होत आहे असे वाटत असेल तर काय करावे
स्वस्तिक यंत्र घराच्या मुख्यद्वारावर लावावे.
गणपतीची मूर्ती मुख्यद्वारावराच्या बाहेर आणि आत लावावी.
ईशान्य कोपऱ्यात तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवावे. त्यावर एक वाटी ठेवावी आणि त्यात पाच मोती ठेवावे.
घरामध्ये वास्तु दोष निर्मूलन यंत्र बसवावे.
लाफिंग बुद्ध, कासव आणि रत्नांपासून बनवलेले झाड घरात ठेवावे.
दररोज मीठाने घर पुसावे.
घरात बंद घड्याळ ठेऊ नका.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.