Body Pain  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Home Remedies For Body Pain: शरीरात सतत वेदना होतात का? 'या' 5 आयुर्वेदिक उपायांनी मिळेल आराम

Home Remedies For Body Pain: तुम्हालाही शरीरात वेदना होत असेल तर तुम्ही पुढील आयुर्वेदिक उपाय करू शकता.

Puja Bonkile

these ayurvedic remedies can provide immediate relief from body pain read full story

आजकालच्या धावपळीच्या जीवनात ऑफिस आणि घराच्या जबाबदाऱ्यांमध्ये आपले शरीरही थकून जाते. अनेक वेळा थकव्यामुळे डोक्यात किंवा शरीरात कुठेतरी वेदना होत राहते. अशा वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही पेनकिलर घेतल्यास त्याचा विपरित परिणाम शरीरावर होतो.

तणावामुळे अनेकांना शरीर किंवा डोके दुखण्याचा त्रासही होतो. काही लोकांना थोड्याशा शारीरिक हालचालीनंतरही पाठ, खांदे किंवा कंबर ते पाय दुखू लागतात. या सर्व समस्यांवर आयुर्वेदिक उपाय करू शकता.

  • मानसिक ताण

कोणत्याही कारणाने डोकेदुखी होत असेल तर दालचिनी टाकून चहा प्यावा. उन्हाळ्यात दालचिनीचा डेकोक्शन बनवून फ्रीजमध्ये ठेवा आणि प्या. यामुळे तणाव दूर होईल, मूड सुधारेल आणि डोकेदुखी देखील बरी होईल. जर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होत असेल तर, मीठ मिक्स करून पिणे सुरू करा. जर साखर नसेल तर तुम्ही त्यात मध देखील घालू शकता.

  • हळदीचे दुध

दुधात हळद उकळून प्यावे. यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती सुधारेल आणि शरीरातील अंतर्गत वेदनाही दूर होतील. दुखापत झाली असेल तरीही हळदीचे दूध प्यावे. याने शरीरातील अंतर्गत सूज कमी होते आणि दुखण्यापासूनही आराम मिळतो. हळद जंतुनाशक आहे, त्यामुळे शरीराच्या अंतर्गत जखमांसाठी उत्तम आहे. हवं असल्यास कच्ची हळद चोळावी आणि तिचा काढा प्यायला सुरुवात करा.

  • आंबट गोष्टी टाळा

लिंबू, टोमॅटो, चिंच, संत्री यासारखे आंबट पदार्थ देखील वेदना वाढवू शकतात. कारण जेव्हा शरीरात अम्लीय पदार्थ असतात तेव्हा तुमची मज्जासंस्था अधिक संवेदनशील होते. तुमच्या लक्षात आले असेल की जेव्हा एखादे लहान मूल लिंबू चाटते तेव्हा ते तोंड मुरडते. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही खूप आंबट पदार्थ खातात तेव्हा तुमच्या मज्जासंस्थेलाही त्रास होतो.

  • तेलाने मसाज करा

ऑलिव्ह ऑईल, खोबरेल तेल, बदाम तेल, एरंडेल किंवा तिळाच्या तेलात लसणाची एक पाकळी उकळवी. नंतर तेल कोमट झाल्यावर संपूर्ण शरीराला मसाज करा आणि किमान 20 मिनिटे उन्हात बसावे. हे शरीरात व्हिटॅमिन डीचे शोषण वाढवते. हे वेदना कमी करण्यास आणि सांधे, स्नायू आणि नसा मजबूत करण्यास मदत करते.

  • कच्चे आणि कोरडे पदार्थ खाणे टाळावे

कच्च्या पदार्थांमुळे पचनसंस्थेवर अधिक ताण पडतो. ते पचवण्यासाठी शरीराला जास्त मेहनत करावी लागते. याशिवाय, ते शरीरात कोरडेपणा वाढवतात, यामुळे वेदनांची संवेदनशीलता वाढते. कच्च्या पदार्थांऐवजी कोमट, चांगले शिजवलेले पदार्थ, हलके मसाले, हलके मीठ आणि पुरेसा ओलावा असलेले पदार्थ खावे. उदाहरणार्थ, ओट्स आणि शरीरातील वेदना कमी करण्यास मदत करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

E-Waste: प्रत्येक नव्या खरेदीमागे जुन्या उपकरणांचा कचरा वाढतो, तोच ढीग गंभीर समस्या म्हणून उभा राहतो; ई-कचऱ्याचा विळखा

Super Cup: सुपर कपचा बिगुल! 25 ऑक्टोबरपासून रंगणार थरार; FC Goa समोर विजेतेपद राखण्याचे खडतर आव्हान

Goa Taxi: 'टॅक्‍सी ॲग्रीगेटर जबरदस्तीने लादणार नाही'! गुदिन्‍होंची हमी; सरकारकडे सुमारे 3500 सूचना, हरकती

Panaji: ‘बोर्डवॉक’ची पणजी महानगरपालिका दुरुस्ती करणार? 2 वर्षांपासून दुर्दशा; धोका असूनही नागरिकांचा वावर

Chandel Hasapur: सरपंचालाच मिळाली सरकारी नोकरी, पदासह दिला पंच सदस्यत्वाचा राजीनामा; चांदेल हसापूरमध्ये रंगणार रस्सीखेच

SCROLL FOR NEXT