Ram Mandir Ayodhya:  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Ram Mandir Ayodhya: प्राणप्रतिष्ठा म्हणजे काय ती कशी केली जाते ? सविस्तर जाणून घ्या पूजा आणि विधी

Ram Mandir Ayodhya: अयोध्येत राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारीला पार पडणार आहे. प्राणप्रतिष्ठा या शब्दाचा अर्थ आणि विधी काय आहे हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Ram Mandir Ayodhya: अयोध्येत राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारीला पार पडणार आहे. देशभरात भाविकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. नव वर्षातील हा जानेवारी महिना ऐतिहासिक ठरणार आहे. अलीकडेच (19 जानेवारीला) काळ्या पाषाणातील, चेहऱ्यावर गोड हास्य, भाळी टिळा लावलेल्या श्री रामाच्या अत्यंत सुंदर मुर्तीचा फोटो समोर आला आहे. मात्र धार्मिक मान्यतेनुसार मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्याशिवाय पुजा अपुर्ण मानली जाते. प्राणप्रतिष्ठा म्हणजे काय ती कशी केली जाते हे जाणून घेऊया.

  • प्राणप्रतिष्ठा या शब्दाचा अर्थ काय ?

हिंदु धर्मात मुर्तीची प्राणप्रतिष्ठेला खुप महत्व आहे. कोणत्याही मुर्तीची स्थापना करण्यापुर्वी प्राणप्रतिष्ठापना करणे गरजेचे असते. प्राणप्रतिष्ठा म्हणजे मुर्तींत जीव प्रस्थापित करणे. प्राण म्हणजे शक्ती आणि प्रतिष्ठा म्हणजे स्थापना. वेद आणि पुराणात सांगण्यात आलेल्या विधीनुसार प्राणप्रतिष्ठा केली जाते.

  • प्राणप्रतिष्ठा विधी कशी केली जाते?

कोणत्याही मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यापुर्वी मूर्तीला गंगेच्या पाण्याने स्नान केले जाते.

यानंतर मूर्ती व्यवस्थित स्वच्छ केली जाते.

मूर्तीला नवे आणि स्वच्छ कपडे परिधान केले जाते.

नंतर मूर्तीला स्वच्छ जागी ठेऊन चंदन लावले जाते.

यानंतर मंत्रांचे पठन केले जाते.

यानंतर प्राणप्रतिष्ठेच्या अनुष्ठानाची प्रक्रिया केली जाते.

यावेळी विधिवत पंचोपचाराने पुजा करण्यात येते.

नंतर आरती करून भाविकांमध्ये प्रसाद वाटला जातो.

  • प्राणप्रतिष्ठा करणे का गरजेचे असते?

धार्मिक मान्यतेनुसार प्राणप्रतिष्ठा केल्याशिवाय मूर्तीची पुजा करणे शुभ मानले जात नाही. प्राणप्रतिष्ठा केल्याने मुर्तीत प्राण आणले जाते. यानंतरच मुर्तीची पुजा करणे शुभ मानले जाते. प्राणप्रतिष्ठा करून मुर्तीत देव विराजमान होतात अशी भाविकांची धारणा आहे. प्राणप्रतिष्ठा शुभ मुहुर्तावर आणि योग्य तिथीवर करणे गरजेचे असते. अयोध्येत प्रभू श्री रामाचे प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीला 12:15 ते 12:45 या वेळेत होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT