Ram Bhog Prasad: अयोध्येतील राम मंदिरात आज प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. आजचा दिवस रामभक्तांसाठी उत्सवपर्व आहे. तसेच देशभरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. घराघरामध्ये लोक रामाची पुजा करणार आहे. यादरम्यान प्रभू श्री रामाला कोणते पदार्थ अर्पण करावे हे जाणून घेऊया.
खीर
प्रभू श्री रामाला खीर खूप आवडते. दूध आणि खव्यापासून बनवलेली खीर भगवान रामाला अर्पण करू शकता. धार्मिक मान्यतेनुसार प्रभू श्री रामाच्या जन्माच्या वेळी खीर बनवली गेली होती. याच कारणामुळे रामललाला खीर खूप आवडते.
कोथिंबीर पंजिरी
प्रभू श्री रामाला कोथिंबिरीपासून बनवलेली पंजिरी अर्पण करणे देखील खूप शुभ मानले जाते. रामाच्या पूजेच्या वेळी पंजिरी विशेषतः साखर आणि गूळ घालून बनवली जाते.
तुळशीचे पानं
प्रभू श्री रामाची पूजा करताना तुळशीचा वापर करणे गरजेचे आहे. प्रभू श्री रामची पूजा तुळशीच्या पानांशिवाय अपूर्ण मानली जाते. यामुळे सर्व पदार्थांवर तुळशीचे पान ठेवावे.
खव्याचे पदार्थ
प्रभू रामाला कलाकंद आणि बर्फी अर्पण करता येते. मार्केटमधून विकत आणल्यापेक्षा घरीच बर्फी बनवावी. कारण त्यात भेसळ असु शकते.
तसेच धार्मिक मान्यतेनुसार प्रभू श्री रामाला जांभूळ आणि बोर आवडते फळं आहेत. यामुळे हे फळं देखील अर्पण करू शकता.
(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.