Maharashtra famous hill station Lonavla Khandala is a must going place
Maharashtra famous hill station Lonavla Khandala is a must going place  
लाइफस्टाइल

पुणे-मुंबईकरांचं आवडतं हिल स्टेशन 'लोणावळा-खंडाळा' तुम्ही बघितलं का?

गोमन्तक वृत्तसेवा

उन्हाळ्याची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे. काही दिवसांतच गर्मी वाढून, अंगाची काहिली व्हायला सुरवात होईल. या गर्मीपासून थोडे दिवस का होईना सुटका करून घेण्यासाठी नागरिक थंड हवेच्या ठिकाणाची वाट धरतात. बर्‍याच लोकांना निसर्गाची आवड असते, म्हणूनच ते नेहमीच फिरण्यासाठी अशा जागा शोधतात, जिथे नैसर्गिक सौंदर्य, नद्या, धबधबे आणि पर्वतं असतील, म्हणून आज आम्ही तुम्हाला अशाच एका जागेबद्दल सांगणार आहोत, जिथे आपण या सगळ्या गोष्टींचा आनंद घेऊ शकता. जर तुम्हालाही निसर्गाची आवड असेल तर तुमच्यासाठी लोणावळा-खंडाळा हे सर्वोत्तम ठिकाण आहे. हे शहर आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी भारतभरात प्रसिद्ध आहे. 

हे ठिकाण महाराष्ट्राच्या सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेलं आहे. लोणावळा-खंडाळा सुंदर डोंगर-दऱ्या आणि धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे. आपण फोटोग्राफीचे शौकीन असल्यास आपल्यासाठी हे स्थान उत्तम आहे. हे ठिकाण समुद्र सपाटीपासून 625 मीटर उंचीवर आहे, ज्या टेकडीवर हे ठिकाण आहे, त्याला मणी असेही म्हणतात. इथल्या टेकड्या इतक्या सुंदर आहेत की याला महाराष्ट्राचे स्वित्झर्लंड म्हणूनही ओळखलं जातं. इथं तुम्ही टेकड्या, कुणे पॉईंट, लोणावाळा तलाव, रेन फॉरेस्ट आणि शिवाजी पार्क, टाटा लेक, टायगर लॅप, टुंगर्ली तलाव आणि धरण, बलवान तलाव या नैसर्गिक ठिकाणांचा आनंद घेऊ शकता.

इथं सुंदर पर्वतं आणि तलाव तसंच अनेक प्राचीन वास्तुकलेची मंदिरं आहेत. इथं तुंम्हाला भाजे लेणी, बेरसा लेणी, अमृतानंजन पॉईंट, ड्यूक नोज, राजमाची दुर्ग, रिव्हर्सिंग पॉईंट, रायवूड पार्क, भूशी धरणे आणि योग संस्था देखील फिरता येईल. अशा या निसर्गरम्य ठिकाणी एकदा तरी निवांत वेळेचा अनुभव घ्यायलाच हवा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

Goa Today's News Wrap: शशी थरूर, पवन खेरा गोव्यात, शहांची शुक्रवारी सभा; गोव्यातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT