Magnesium Mineral Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Magnesium Mineral: मॅग्नेशियमची पातळी कमी झाल्यास शरीरात दिसतात 'ही' लक्षणे

Puja Bonkile

Magnesium Mineral: शरीराला निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला अनेक प्रकारच्या पोषक घटकांची आवश्यकता असते. मॅग्नेशियम देखील त्यापैकी एक आहे. मॅग्नेशियम हे एक खनिज आहे जे शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. स्नायू आणि हाडे मजबूत ठेवण्यास मदत करते. तसेच, हृदयाच्या योग्य कार्यासाठी मॅग्नेशियम आवश्यक आहे. पण याची कमतरता असल्.ास कोणती लक्षण जाणवताता हे जाणून घेऊया.

  • मॅग्नेशियमची कमतरता असल्यास कोणती लक्षणे दिसतात

रात्री पायात क्रॅम्प येणे

शरीरात मॅग्नेशियमची कमतरता असल्यास सर्वात सामान्य लक्षणांपैकी एक म्हणजे क्रॅप येणे. मॅग्नेशियम स्नायूंच्या कार्यासाठी खूप महत्वाचे मानले जाते. जेव्हा शरीरातील मॅग्नेशियमची कमी असते, तेव्हा स्नायूंमध्ये क्रॅम्प सुरू होतात. हे अनेकदा रात्री घडू शकते.

थकवा

मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे तुम्हाला थकवा आणि अशक्तपणाचाही सामना करावा लागतो. शरीरात ऊर्जा निर्मितीसाठी हे खनिज अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे, शरीराला पुरेशी ऊर्जा निर्माण करण्यात खूप अडचणींना तोंड द्यावे लागते. ज्यामुळे थकवा आणि अशक्तपणा येतो.

वारंवार डोकेदुखी

शरीरात मॅग्नेशियमची पातळी कमी असल्याने वारंवार डोकेदुखीच्या समस्येला सामोरे जावे लागते. यासाठी याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी डॉक्टरांशी संपर्क साधावा.

भूक कमी होणे

शरीरात मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे उलट्या होणे, भूक न लागणे इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागते. यामुळे, पचनाच्या समस्या उद्भवू लागतात. ज्यामुळे भुक लागत नाही.

बद्धकोष्ठता

मॅग्नेशियम आतड्यांमधील पाण्याचे प्रमाण वाढवते. ज्यामुळे आतड्याची हालचाल सुलभ होते. शरीरात मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे व्यक्तीला बद्धकोष्ठतेच्या समस्येला सामोरे जावे लागते.

  • मॅग्नेशियमची कमतरता भरून काढण्यासाठी काय करावे

डार्क चॉकलेट

डार्क चॉकलेटमध्ये मॅग्नेशियमसह अनेक पोषक घटक असतात. 'न्यूट्रिएंट्स'मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार यामध्ये लोह, तांबे आणि मॅंगनीजचे प्रमाणही जास्त असते. त्यात फ्लेव्हनॉल असतात. त्यामुळे ते तुमच्या हृदयासाठी फायदेशीर आहे. अनेक संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की फ्लॅव्हनॉल हे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आहे. जे शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते आणि हृदयरोगाचा धोका कमी करते.

सुकामेवा

सुकामेवा हे तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत. सुकामेवा रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉलची पातळी सुधारण्यास देखील मदत करतात. म्हणूनच, तुमचे हृदय सुरक्षित आणि निरोगी ठेवण्यासाठी, दररोज सुकामेव्याचे सेवन करावे.

केळी

स्वस्त आणि सहज उपलब्ध केळी पोटॅशियमचा चांगला स्रोत आहे. पोटॅशियममुळे हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. त्यात मॅग्नेशियम आणि पोटॅशियम दोन्ही आढळतात. त्यामुळे प्रत्येकाने रोज केळीचे सेवन करावे.

हिरव्या पालेभाज्या

मॅग्नेशियम समृद्ध हिरव्या पालेभाज्या नक्कीच तुमच्या रोजच्या आहाराचा एक भाग असावा. पालक, मेथी, मोहरी, काळे या भाज्यांमध्ये मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात आढळते. ज्यामुळे तुमची मॅग्नेशियमची गरज सहज पूर्ण होऊ शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT