New Born Baby Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Jaundice: नवजात बालकांना का होते कावीळ, ती किती धोकादायक? जाणून घ्या कारणे अन् उपचार

Causes Of Jaundice In Babies: लहान मुलांमध्ये कावीळ (Jaundice) ही एक कॉमन समस्या आहे. जन्मानंतर, अनेक बाळांचे डोळे पिवळे दिसू लागतात.

Manish Jadhav

नवजात बाळांमध्ये कावीळ (Jaundice) ही एक कॉमन समस्या आहे. जन्मानंतर, बाळाचे डोळे पिवळे दिसू लागतात तेव्हा लगेच ओळखावे की, त्याच्या शरीरात बिलीरुबिन जास्त प्रमाणात तयार झाले आहे, ज्यामुळे नवजात बाळाला कावीळ होते. सहसा काही दिवसात बाळ या अजारातून बरे होते, परंतु कधीकधी हा आजार गंभीर देखील असू शकतो. अशा परिस्थितीत नवजात बाळाची काळजी घेणे गरजेचे बनते. विशेषतः पालकांनी याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. चला तर मग नवजात बाळांना कावीळ का होते ते जाणून घेऊया...

कावीळ होण्याची अनेक कारणे

डॉ. विपिन चंद्र उपाध्याय यांनी सांगितले की, नवजात बाळामध्ये कावीळ होण्याची अनेक कारणे आहेत. यापैकी, गर्भाशयात वाढणारे बाळ पूर्णपणे विकसित न होणे. गर्भवती महिलांचे पौष्टिक आहाराकडे दुर्लक्ष ही कारणे असू शकतात.

लिव्हर पूर्णपणे विकसित न होणे

जन्मानंतर, बाळाचे लिव्हर योग्यरित्या कार्य करण्यास सुरुवात करत नाही, ज्यामुळे शरीरात बिलीरुबिन जमा होते, त्यामुळे नवजात बाळाला कावीळ होते.

लाल रक्तपेशींचे वाढलेले विघटन

नवजात बाळामध्ये जास्त लाल रक्तपेशी तयार होतात आणि तुटतात, ज्यामुळे बिलीरुबिन वाढते. नवजात बाळामध्ये बिलीरुबिन वाढल्यास कावीळ होण्याचा धोका जास्त असतो.

सामान्य रक्तगट नसणे

जर आई आणि बाळाचे रक्तगट वेगवेगळे असतील तर अशा परिस्थितीतही कावीळ होण्याचा धोका वाढतो.

कावीळ किती धोकादायक असू शकतो?

कोणताही आजार शरीरासाठी धोकादायक असला तरी, कावीळ 1-2 आठवड्यात आपोआप बरी होते. परंतु काही प्रकरणांमध्ये बाळाची स्थिती गंभीर होऊ शकते. जर शरीरात बिलीरुबिनची पातळी खूप वाढली तर ते बाळाच्या मेंदूला हानी पोहोचू शकते, ज्यामुळे मानसिक विकासात अडथळा येऊ शकतो. जर कावीळ बराच काळ राहिली तर त्याचा परिणाम लिव्हरवर होऊ शकतो.

उपचार कसे करावे?

बाळाला वारंवार स्तनपान केल्याने कावीळ लवकर बरी होते. जर मुलाला कावीळ (त्वचा किंवा डोळे पिवळे होणे) ची लक्षणे दिसली तर तात्काळ डॉक्टरांना (Doctor) दाखवा. या बाबतीत निष्काळजी राहू नका.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT