Instagram Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Instagram New Feature: आता Instagram वर करू शकाल मॅसेज एडिट, जाणून घ्या सेटिंग

Puja Bonkile

Instagram new feature now you can edit message within 15 minutes after sending know about setting

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामने आपल्या यूजर्ससाठी नवे फिचर लाँच केले आहे. आता या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कोणताही मॅसेज पाठवल्यानंतर तुम्ही त्याला एडिट करू शकता. 

इंस्टाग्रामने या फीचरबद्दल माहिती दिली आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की आता कोणताही यूजर मेसेज पाठवल्यानंतर 15 मिनिटांच्या आत बदल करू शकतो. जे लोक मॅसेज पाठवताना चुका करतात त्यांच्यासाठी हे अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. 

व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम सारख्या सोशल मॅसेजिंग प्लॅटफॉर्मवर आधीपासूनच मॅसेज एडिटि करण्याचे फिचर चालू आहे. आता इन्स्टाग्राम देखील हे सुरू केले आहे.

मॅसेजवर एडिटेड लिहीलेले दिसेल

तुम्ही इंस्टाग्रामवर एखाद्याला पाठवलेल्या मॅसेजमध्ये बदल केल्यास, म्हणजे एडिट केले, तर समोरच्या व्यक्तीला त्याची माहिती मिळेल. खरं तर, एकदा तुमचा मॅसेज बदलला की तो 'एडिटेड' लेबल असलेल्या चॅटबॉक्समध्ये दिसतो.

जाणून घ्या सेटिंग

सर्वात पहिले Instagram ॲप उघडा आणि मॅसेज बॉक्समध्ये जावे.

मॅसेज बॉक्समध्ये तुम्हाला बदलायचा असलेल्या मॅसेजवर जा आणि त्यावर क्लिक करा.

मॅसेजवर क्लिक केल्यानंतर काही वेळ दाबून ठेवा.

दिसत असलेल्या पर्यायांमधून एडिट सिलेक्ट करा आणि मॅसेज एडिट करा.

मॅसेज पाठवल्यानंतर 15 मिनिटांच्या आत एडिट करावे.

या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात

तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की मॅसेजमध्ये बदल केल्यानंतर त्यावर एडिटेड लेबल लावले जाईल.

तुमचा मॅसेज एडिट होण्यापूर्वीच समोरच्या व्यक्तीने वाचला असण्याची शक्यता आहे.

अशानेळी तुमच्या एडिटेड मॅसेजची सूचना न वाचलेल्या स्वरूपात त्याच्या इनबॉक्समध्ये पोहोचेल.

तुमच्या एडिट मॅसेजबाबत अहवाल तयार केल्यास, एडिट हिस्ट्री देखील अहवालात जोडला जाईल.

ज्या मॅसेमध्ये कोणाला मेंशन केलेले असेल तर तो एडिट होणार नाही.

कोणताही मॅशेज जास्तीत जास्त 5 वेळा एडिट केला जाऊ शकतो, म्हणजेच यानंतर त्यात कोणताही बदल होणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: हिंदुत्ववादी संघटनांचे वेलिंगकरांना समर्थन, ख्रिस्ती समाजाकडून अटकेची मागणी; राज्यभरात मोर्चे

Mhadei Water Dispute: ...कर्नाटकाविरोधात लढण्यास सावंत सरकार ठरले कुचकामी; आलेमाव यांचा घणाघात

Goa Navratri 2024: छत्रपती शाहू महाराजांच्या सातारा दरबारातील सरदाराने गोव्यात बांधलेले एकमेव मंदिर

Rashi Bhavishya 5 October 2024: बिझनेसमध्ये धनप्राप्तीचा योग, पितृसुखाची छाया आणि खरेदीचा उत्तम संयोग; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

Goa Crime News: पैशांसाठी मित्रांचा खून करणारा काजीदोनी दोषी; संशयिताची बाजू ऐकून कोर्ट ठोठावणार शिक्षा

SCROLL FOR NEXT