sim card.jpg
sim card.jpg 
लाइफस्टाइल

तुमच्या नावावर किती सीम कार्ड अॅक्टिव आहेत? अशी मिळवा माहिती

दैनिक गोमंतक

तुमच्या नावावर दुसरे कोणी मोबाइल नंबर वापरत असेल तर याची माहिती आता आपल्याला समजू शकणार आहे. तुमच्या नावावर सध्या किती सीम कार्ड अॅक्टिव आहेत. यासाठी दूरसंचार विभागाकडुन  एक पोर्टल tafcop.dgtelecom.gov.in लॉंच केले आहे. त्याच्याच मदतीने तुमच्या नावावर किती मोबाइल नंबर वापरले जात आहे यांची माहिती मिळावु शकता. (How many SIM cards are active in your name? Get information like that) 

दुसऱ्या व्यक्तींच्या व्ययक्तिक माहितीचा वापर करून मोबाइल सीम कार्ड घेणे कायद्याने गुन्हा आहे, अशी माहिती दूरसंचार विभागाचे उप संचालक जनरल ए रॉबर्ट यांनी दिली आहे. परंतु अशा बेकायदेशीर घटना वारंवार घडात आहेत. त्यामुळेच डिपार्टमेंटने या टूलला लॉंच केले आहे. या टूलच्या मदतीने तुम्ही जो नंबर वापरत नसाल अशा नंबर पासून सुटका मिळवू शकता. लोकाना त्यांच्या नावावर कोण-कोण सीम कार्ड वापरत आहेत आणि किती मोबाइल नंबर सुरू आहेत याची माहिती वेबसाइटवर मिळते. तसेच त्या मोबाइल नंबर ला ब्लॉक करण्याची विनंती करू शकतात. 

महत्वाचे मुद्दे

  • तुमच्या नावावर किती सीम कार्ड अॅक्टिव आहेत 
  • तुमच्या नावाचा वापर करून अन्य कोणी सिमकार्ड वापरतो का 
  • एक व्यक्ति किती सीमकार्ड वापरू शकतो

एक व्यक्तीला जास्तीत जास्त नऊ मोबाइल नंबर दिले जाऊ शकतात. अनेकांच्या नावावर नऊहून जास्त मोबाइल नंबर सुरू आहेत. हे पोर्टल  आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या लायसन्स असलेल्या सेवा क्षेत्रात आहे. त्या बरोबरच या सेवेला अन्य फेज मध्ये लागू केले जाणार आहे. तुमच्या नावावर किती नंबर अॅक्टिव आहेत याची माहिती करून घेण्यासाठी ग्राहकाला या पोर्टलद्वारे लगेच आपल्या नावर सुरू असलेले कनेक्शन संबंधित माहिती मिळवता येते.

यासाठी त्यांना अॅक्टिव नंबर टाकावा लागतो. त्या नंतर एक ओटीपी मिळतो. या पद्धतीने सर्व अॅक्टिव नंबर्सच्या संबंधित माहिती मिळवता येते. डिपार्टमेंटच्या सर्व कंज्यूमर्सला SMS च्या मध्यमातून कोणाच्या नावावर किती मोबाइल नंबर अॅक्टिव आहेत याची माहिती देण्यात येते. या नंतर कंज्यूमर्स पोर्टलवर जाऊन त्या नंबरविषयी तक्रार करून, या नंबरचा वापर होतो की नाही कीवा त्याची गरज आहे की नाही याची माहिती मिळते. युजर्सच्या तक्रारी नंतर टेलिकॉम सर्विस प्रोव्हाइडर त्या नंबरला डिअॅक्टिव करते.         
          

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रोदा 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT