Monsoon Recipe| crispy onion rings
Monsoon Recipe| crispy onion rings Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Monsoon Recipe: रिमझिम पाऊस अन् सोबतीला क्रिस्पी ओनियन रिंग्स, चहाची मज्जाच डबल

दैनिक गोमन्तक

पावसाळ्यामध्ये (Monsoon) तुम्ही जर कांदा भजी खाऊन बोर झाले असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. पावसाळ्यात चहासोबत गरमा गरम स्नॅक्स खायला मिळाले तर मजाच काही वेगली आहे. क्रिस्पी ओनियन रिंग्स (crispy onion rings) बनवायला अगदी सोपे आहे. शिवाय तुम्ही घरी असलेल्या टी पार्टी, किटी पार्टी यासाठी सुद्धा हे बेस्ट ऑप्शन आहे. अतिशय झटपट बनवणारी ही रेसिपी खायला तर टेस्टी आहे चला तर मग करून पहा हे क्रिस्पी ओनियन रिंग्सची रेसिपी. (crispy onion rings recipe news)

ओनियन रिंग्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य

- 2 कांदे

- 1 कप मैदा

- 1 टीस्पून गार्लिक पावडर

- 1 टीस्पून ऑलिव्ह ऑइल

- 1 टीस्पून दूध

- 1 टीस्पून ओरिगॅनो

- 1 टीस्पून काळी मिरी पावडर

- अर्धा टीस्पून बेकिंग पावडर

- अर्धा कप ब्रेड क्रम्ब्स

- गरजेनुसार मीठ

- गरजेनुसार तेल

* ओनियन रिंग्स बनवण्याची पध्दत

क्रिस्पी ओनियन रिंग्स बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊल मध्ये मैदा घ्यावा. त्यात गार्लिक पावडर, ऑलिव्ह ऑइल, दूध, ओरिगॅनो, काळी मिरी पावडर, बेकिंग पावडर, मीठ हे सर्व पदार्थ चांगले मिक्स करा. नंतर थोडे पाणी टाकून याचे बॅटर तयार करा. हे बॅटर खूप घट्ट किंवा पातळ होणार नाही याची काळजी घ्या. आता कांदे गोल कापून घ्यावे. कांद्याच्या स्लाइसमधून एक एक रिंग वेगळे करून घ्या. आता एक रिंग या तयार सारनामध्ये बुडवा आणि नंतर ब्रेड क्रम्ब्सने घोळावे. आता एका कढईमध्ये तेल गरम करा. ब्रेड क्रम्ब्समध्ये कोट केलेल्या रिंग तेलात चांगले क्रिस्पी, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळावे. तुमचे क्रिस्पी ओनियन रिंग्स तयार आहेत. तुम्ही हे गरम चहा किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: पल्लवी धेंपे, सिद्धेश नाईक मंत्री ढवळीकर यांच्याविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

गोवा निवडणूक काळात केजरीवालांचा सेव्हन स्टार हॉटेलमध्ये मुक्काम, कोणी दिले बिल? ED ची कोर्टात माहिती

Goa Petrol-Diesel Price: राज्यातील पेट्रोल-डिझेलच्या किमतीत किंचित बदल; वाचा सविस्तर दर

Jammu and Kashmir: कुलगाममध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्करचा टॉप कमांडर ठार; तीन दहशतवादीही ढेर

Goa Election 2024: दाबोळीत लोकशाहीचा खून, पोलिस संरक्षणात पैसे वाटल्याचा काँग्रेस उमेदवार विरियातोंचा आरोप

SCROLL FOR NEXT