Vastu Tips For Home
Vastu Tips For Home Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Feng Shui Tips: घरातली नकारात्मकता दूर करण्यासाठी फॉलो करा 'या' फेंगशुई टिप्स

दैनिक गोमन्तक

Feng Shui Tips: फेंगशुई शास्त्रामध्ये घर कसे असावे आणि त्याला सकारात्मक उर्जेने कसे भरून टाकावे याबाबत माहिती दिली आहे. तुमच्या घरात जर चिडचिडेपणा, नकारात्मकता असेल तर तुम्ही फेंगशुईमधील टिप्स फॉलो करु शकता.चला तर मग जाणून घेऊया फेंगशुईचे नियम ज्यामुला घरातील नकारात्मकता दुर होउ शकते.

  • घरात ठेवा या वनस्पती

घरातील नकारात्मक शक्ती दुर करण्यासाठी तुम्ही तुमच्या घरामध्ये काही इनडोअर रोपे देखील लावू शकता. ही रोपे तुमच्या घरात (Home) सकारात्मक उर्जा निर्माण करतात. घरात गोलाकार पाने असलेली झाडे लावणे चांगले मानले जाते. ते ऑक्सिजनची पातळी देखील राखतात.

  • फर्निचर ठेवण्याची योग्य पद्धत

ऑफिस आणि घरात दोन्ही ठिकाणी जिथे तुमची बसण्याची जागा आहेत तेथे खोलीच्या दारापर्यंत कोणताही अडथळा नसावा. दारातूनच सकारात्मक ऊर्जा वाहते असे मानले जाते. अशा वेळी अडथळ्यांमुळे तुमच्या आयुष्यातही अडथळे निर्माण होतात असे फेंगशुई सांगण्यात आले आहे.

  • घरातले निरोपयोगी वस्तु बाहेर काढावे

काहीच उपयोग नसलेल्या वस्तु घरातून बाहेर काढा असे फेंगशुईमध्ये सांगण्यात आले आहे. जास्त सामान घरातल्या सकारात्मकतेचा प्रवाह कमी करतो असे फेंगशुई सांगते. जर तुमच्या घरात इतके सामान असेल ज्यामुळे तुमच्या चालण्याच्या मार्गात अडथळा येत असेल तर ते चुकीचे मानले जाते. जेव्हा असे होते तेव्हा तुमच्या घरातील सकारात्मक उर्जेच्या प्रवाहात अडथळा येतो आणि तणाव वाढतो.

  • सोफ्याची योग्य दिशा

फेंगशुईमध्ये सोफ्यासमोरचे टेबल गोल नसून चौकोनी असावे असे सांगण्यात आले होते. फेंगशुईमध्ये सकारात्मक ऊर्जेच्या प्रवाहात कोणताही अडथळा येऊ नये यावर भर दिला जातो.

  • प्रवेशद्वार

फेंगशुईमध्ये घराच्या प्रवेशद्वाराला खूप महत्त्व दिले गेले आहे. फेंगशुईनुसार घराचे प्रवेशद्वार अतिशय स्वच्छ आणि व्यवस्थित असावे. बाहेरून येताना घरात प्रवेश करताना कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये. कुलूप उघडण्यास आणि बंद करण्यास कोणतीही अडचण नसावी असेही फेंगशुईत सांगण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT