Dhanteras 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Dhanteras 2023: धनत्रयोदशीला पालीसह 'या' 5 गोष्टी दिसणे मानले जाते शुभ

धनत्रयोदशीला सोने-चांदी खरेदी करणे खूप शुभ असते. यंदा 10 नोव्हेंबर 2023 रोजी धनत्रयोदशी साजरी केली जाणार आहे. असे मानले जाते की या दिवशी काही प्राणी अचानक दिसणे खूप शुभ असते.

Puja Bonkile

Dhanteras 2023: सनातन धर्मात धनत्रयोदशीपासून पाच दिवस मोठे सण सुरू होतात. या दिवशी धनाची देवता माता लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा केली जाते. या दिवशी लोक सुख, समृद्धी आणि संपत्तीची कामना करतात. यासोबतच धनत्रयोदशीला सोने-चांदी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. यंदा 10 नोव्हेंबरला धनत्रयोदशी साजरी केली जाणार आहे. 

या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे खूप शुभ असते. असे मानले जाते की या दिवशी काही प्राणी किंवा व्यक्ती अचानक दिसणे खूप शुभ असते. यामुळे घरात सुख-शांती लाभते.

सरडा

शास्त्रीय मान्यतेनुसार धनत्रयोदशीला सरडा दिसणे खूप शुभ मानले जाते. शास्त्रामध्ये सरडे हे लक्ष्मीचे प्रतीक मानले गेले आहे. अशावेळी धनत्रयोदशीला सरडा दिसला तर समजून घ्या की लवकरच देवी लक्ष्मी घरात येणार आहे. तुमच्या समस्या लवकरच संपणार आहेत. 

घुबड

धनत्रयोदशीला माता लक्ष्मीवर स्वार झालेले घुबड पाहणे खूप शुभ लक्षण आहे. कारण यामुळे आर्थिक समस्या कमी होऊ शकतात. तसेच घरात सुख-समृद्धी नांदेल. तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा कायम राहील.

ट्रान्सजेंडर

धनत्रयोदशीला बाजारात खरेदी करताना किंवा हिंडताना एखादा नपुंसक दिसला तर ते खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी नपुंसक दिसणे हे माता लक्ष्मीचा आशीर्वाद दर्शवते. या दिवशी एखाद्या नपुंसकाने तुम्हाला नाणं दिले तर तुमच्या आयुष्यात पैशाची कमतरता भासणार नाही. आर्थिक संकट आणि कर्जही संपते. 

पांढरी मांजर

धनत्रयोदशीला पांढरी मांजर पाहणे देखील खूप शुभ मानले जाते. पांढरी मांजर दिसल्यास तुमच्या व्यवसायत आणि नोकरीत प्रगती होऊ शकते.

रस्त्यावर पडलेले पैसे

शास्त्रानुसार धनत्रयोदशीला रस्त्यात नाणी पडलेली दिसली तर ते खूप शुभ असते. धनाची देवी माता लक्ष्मी आहे. यामुळे पैसे  दिसल्यास घरात सुख-समृद्धी नांदेल. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Krittika Nakshatra: गोव्यात कृत्तिका पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्व आणि फायदे

युथ काँग्रेसची म्हार्दोळ पोलिस ठाण्यावर धडक, Cash For Job प्रकरणी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Raechelle Banno: 'IFFI ला माझ्या चित्रपटाने सुरुवात झाली हे पाहून आनंद झाला'; बेटर मॅनच्या अभिनेत्रीने भूमिकेच्या दबावाबद्द्ल मांडले मत

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

SCROLL FOR NEXT