Chandra Grahan 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Chandra Grahan 2023: चंद्रग्रहणानंतर घर अन् मंदिर असे करा स्वच्छ; वर्षभर राहिल सुख-शांती

चंद्रग्रहणानंतर घरातील सुख-शांती कायम राहण्यासाठी कशी स्वच्छता करावी हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Chandra Grahan 2023: ग्रहण ही एक प्रक्रिया आहे जिला ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहणाचे कारण म्हणजे चंद्रावर राहूची सावली, हा काळ अत्यंत अशुभ मानला जातो. याचा लोकांवर ग्रह, नक्षत्र आणि राशीनुसार प्रभाव पडतो. हे शुभ आणि अशुभ दोन्ही असू शकते. 

त्याचप्रमाणे शनिवारी होणाऱ्या चंद्रग्रहणाचा प्रभाव सर्वांवर पडतो. शनिवारी शरद पौर्णिमेसह वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण रात्री उशिरा सुमारे एक तास सहा मिनिटे चालले. असे मानले जाते की ग्रहणाच्या नऊ तास आधी आणि नंतर घरात ठेवलेला प्रत्येक खाद्य पदार्थ दूषित होतो. ते अशुभ आणि अपवित्र मानले जाते. 

त्यामुळे ग्रहणाच्या नऊ तास आधी सुतक पाहता मंदिराचे दरवाजे बंद करून लोकांना काहीही न खाण्याचा सल्ला दिला जातो. ग्रहण संपल्यानंतर शुद्धीकरण कसे करावे आणि कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. ज्यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते हे जाणून घेऊया.

  • घरातील मंदिर गंगाजलाने स्वच्छ करावे

चंद्रग्रहण संपल्यानंतर सकाळी उठल्यानंतर थेट पूजा करण्याऐवजी स्नान करून घरातील मंदिरात गंगाजल शिंपडावे. यामुळे घरातील सर्व अशुद्धता निघून जाते. घरात सुख-शांती नांदते. 

  • प्रार्थना करावी

ग्रहणानंतर काही वेळ देवाची प्रार्थना करावी. अगरबत्ती आणि दिवे लावावे आणि ते घरभर फिरवावे. यामुळे संपूर्ण घरातील नकारात्मकता दूर होईल. पृथ्वीवर सकारात्मक ऊर्जा राहते. सुख-समृद्धीही लाभेल. 

  • मंत्राचा जप करावा

चंद्रग्रहणानंतर घरामध्ये गंगाजल शिंपडावे आणि मंत्रांचा जप करावा. जर तुम्हाला कोणताही मंत्र माहित नसेल तर तुम्ही फक्त गायत्री मंत्राचा जप करू शकता. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते. ग्रहणाचा प्रभाव संपतो. ग्रहणकाळात तुम्ही चंद्राशी संबंधित मंत्रांचा जप करू शकता. हे खूप शुभ मानले जाते.  यामुळे कुंडलीत चंद्राची स्थिती मजबूत होते. 

  • हार आणि फुले फेकून द्यावे

घरातील मंदिरामध्ये असलेले फुल आणि हार  चंद्रग्रहणानंतर बदलावे. ते पुन्हा वापरू नका. हे सर्व ग्रहण काळात दूषित होतात. त्यामुळे ग्रहणानंतर ते काढून टाकावेत. तसेच साफसफाई केल्यानंतर नवीन कापड पसरावे. 

  • खाद्यपदार्थ खाउ नका

ग्रहणकाळात घरात काही खाद्यपदार्थ ठेवलेले असतील तर ते ग्रहणानंतर थेट खाऊ नका. हे खाणे टाळावे. पण जर तुम्हाला ते खायचे असेल तर गंगाजल किंवा तुळशीची पाने घालावे. यानंतरच याचे सेवन करावे. यामुळे ग्रहणाचा प्रभाव नाहीसा होतो. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

Saint Francis Xavier Exposition: "सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शव म्हणजे दैवी चमत्कार": फादर हेन्री फाल्काओ

Saint Francis Xavier Exposition In Pictures: ओल्ड गोव्यात एक्सपोझिशनला सुरुवात; पाहा पहिल्याच सोहळ्याचे खास फोटो

SCROLL FOR NEXT