Black Garlic  useful for lowering high blood pressure  cholesterol
Black Garlic useful for lowering high blood pressure cholesterol Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Black Garlic उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उपयुक्त

दैनिक गोमन्तक

लसूण (Garlic) स्वयंपाकघरातील एक महत्वाचा पदार्थ आहे. लसूण आपण अनेक पदार्थांमध्ये वापरतो. लसूण आपल्या आरोग्यासाठी (Health) लाभदायी आहे. पण तुम्हाला काळ्या (Black Garlic) लसूणबद्दल माहिती आहे का? या लसूणचा वास तीव्र आहे परंतु चव तितकी मजबूत नाही. पण हळूहळू हा लसूण जगातील लोकणाच्याआरोग्यासाठी सुपरफूड (superfood) म्हणून उदयास येत आहे.

काळ्या लसूणमध्ये उच्च रक्तदाबाशी लढण्याची क्षमता असते. यात प्रथिने आणि बी जीवनसत्त्वेही भरपूर असतात. परंतु त्याशिवाय, ते कोलेस्ट्रॉल, टाइप 2 मधुमेह,थकवा आणि ताणावाचा धोका कमी करण्यासाठी एक सुपर फूड म्हणून कार्य करते. तर यात अँटिऑक्सिडेंट गुणधर्म आहेत. यामुळे पचन संस्था सुरळीत कार्य करते. तसेच रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.

काळ्या लसूणमद्धे बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि जंतूनाशक गुणधर्म असतात. शिवाय यामध्ये व्हिटॅमिन सी असते. हे व्हायरस आणि बॅक्टेरियापासून संरक्षण करण्यास मदत करते.

काळ्या लसूणमध्ये अमिनो अॅसिड चा पुरवठा करतो. यात आर्जिनिन आणि ट्रिप्टोफॅनचा समावेश आहे. अमीनो आम्ल हा एक आवश्यक घटक आहे. याचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. यामुळे हे सुपरफूड म्हणून ओळखले जाते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो . हे रक्तवाहिन्याची स्थिती सुधारण्यास मदत करते, कारण ते रक्तातील ट्रायग्लिसेराइड्स आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करते.

काळा लसूण प्रोटीन आणि कोलेजनचा स्रोत आहे. त्वचेच्या आरोग्यासाठी कोलेजन महत्वाचे आहे. प्रथिने सांधे आणि हाडे मजबूत करण्यास मदत करतात.

काळ्या लसूणचे अनेक फायदे आहेत. हे अनेक पदार्थांमध्ये वापरले जाते. त्यामुळे जेवणाची विशेष चव वाढते. काळे लसूण सॅलड, चिकन, टोस्ट किंवा पास्तामध्ये वापरले जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT