श्रीलंकेच्या सर्वात यशस्वी फलंदाज आणि माजी कर्णधार दिमुथ करुणारत्नेनं त्याच्या १०० व्या कसोटी सामन्यानंतर क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
गुरुवारपासून गॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरू होणारा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा त्याचा दुसरा कसोटी सामना हा त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना असेल.
दिमुथ करुणारत्नेनं त्याच्या कारकिर्दीत १६ कसोटी शतकं आणि ३९ अर्धशतकं झळकावली आहेत. त्यानं संघासाठी ५० एकदिवसीय सामने खेळले असून ३१ पेक्षा जास्त सरासरीनं १३१६ धावा केल्या आहेत.
एकदिवसीय फॉर्मेटमध्ये या सलामीवीर फलंदाजानं १ शतक आणि ११ अर्धशतकं ठोकली आहेत. २०१९ च्या आयसीसी विश्वचषकात तो संघाचा कर्णधारही राहिला आहे.
श्रीलंकेसाठी अनेक महत्त्वाच्या कसोटी सामन्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. दिमुथ करुणारत्ने त्याच्या कारर्किदीतील १००वा कसोटी सामना खेळणार असून त्यानंतर तो क्रिकेटला अलविदा करणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.