Makar Sankranti 2022
Makar Sankranti 2022 Dainik Gomantak
Image Story

Makar Sankranti 2022: ओमिक्रॉनपासून दुर राहण्यासाठी खा तीळ-गुळाचे लाडू

दैनिक गोमन्तक
Makar Sankranti 2022: Eat sesame jaggery laddu for healthy life

प्रत्येक सणाप्रमाणे, मकर संक्रांती (Makar Sankranti 2022) देखील हिंदू धर्मात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. देशातील विविध राज्यांमध्ये तसेच परदेशातही हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. या सणात तीळ-गुळाचे (sesame jaggery laddu) दान आणि सेवन करण्याचे खूप महत्त्व आहे. तिळ-गुळाचे लाडू या दिवशी प्रत्येक घरात बनवले जातात.

Makar Sankranti 2022: Eat sesame jaggery laddu for healthy life

तिळाचे लाडू जेवढे चविष्ट असतात तेवढेच ते पौष्टिकही असतात. तीळ आणि गुळात असे अनेक गुणधर्म असतात जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. जर एखाद्याने त्यांचे नियमित सेवन केले तर त्याची प्रतिकारशक्ती वाढू शकते, ज्यामुळे ओमिक्रॉन व्हेरियंटसह कोरोनाच्या विविध प्रकारांपासून संरक्षण मिळू शकते. चला तर मग जाणून घेऊया तिळाचे लाडू खाण्याचे फायदे...

Makar Sankranti 2022: Eat sesame jaggery laddu for healthy life

शरीराला उबदार ठेवते

तीळ आणि गूळ दोन्ही उष्ण असल्याने त्यांचे सेवन केल्याने शरीर उबदार राहते. थंडीच्या मोसमात तीळाचे लाडू नियमित सेवन केल्याने शरीर आतून उबदार राहते आणि शरीराला थंडी जाणवत नाही.

Makar Sankranti 2022: Eat sesame jaggery laddu for healthy life

ब्लड शुगर नियंत्रणात ठेवते

तिळामध्ये कार्बोहायड्रेट फारच कमी असते त्यामुळे याच्या सेवनाने रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवता येते. तिळाच्या बियांमध्ये एक पिनोरेसिनॉल कंपाऊंड देखील असतो जो पाचक एंझाइम, माल्टेजची क्रिया रोखून रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करू शकतो. पण लक्षात ठेवा की मधुमेह असलेल्यांनी तीळ आणि गुळाचे लाडू खाऊ नयेत, तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार इतर कोणत्याही प्रकारे तिळाचे सेवन करावे.

Makar Sankranti 2022: Eat sesame jaggery laddu for healthy life

गुडघेदुखीसाठी उपायकारक

ऑस्टियोअर्थराइटिस (Osteoarthritis) हे सांधेदुखीचे सर्वात सामान्य कारण आहे.

तिळाच्या बियांमध्ये सेसमिन नावाचे एक संयुग असते, ज्यामध्ये दाहक-विरोधी आणि अँटीऑक्सिडंट प्रभाव असतो. हे गुडघ्याच्या कार्टिलेजचे संरक्षण करते, ज्यामुळे गुडघेदुखी कमी होण्यास मदत होते.

Makar Sankranti 2022: Eat sesame jaggery laddu for healthy life

थायरॉईडसाठी फायदेशीर

न सोललेल्या आणि सोललेल्या तिळांमध्ये सेलेनियम चांगल्या प्रमाणात आढळते. 30 ग्रॅम तीळ रोजच्या गरजेसाठी 18 टक्के सेलेनियम पुरवतात. थायरॉईड हार्मोन तयार करण्यात तीळ महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे जर एखाद्याला थायरॉइडची समस्या असेल तर तिळाचे सेवन फायदेशीर ठरू शकते.

Makar Sankranti 2022: Eat sesame jaggery laddu for healthy life

इतर फायदे

याशिवाय तीळ खाण्याचे इतरही फायदे आहेत. जसे की, हाडे मजबूत होतात, अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे, जळजळ कमी करू शकते, रक्तदाब कमी करू शकते, वनस्पती प्रथिनांचा चांगला स्रोत आहे, फायबरचा चांगला स्रोत आहे..

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

Air India Express: एअर इंडिया एक्सप्रेसची गोव्याला येणारी फ्लाईट रद्द, दिल्ली विमानतळावर प्रवाशांचा गोंधळ Video

SCROLL FOR NEXT