Rashi Bhavishya 18 October 2024 Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

गोमन्तक डिजिटल टीम

आजचे पंचांग

शुक्रवार,१८ आक्टोबर २०२४, अश्विन कृष्ण पक्ष,

  • शरद ऋतु,क्रोधी नाम संवत्सर,शके १९४६.

  • तिथि- प्रतिपदा १३l१४

  • रास- मेष

  • नक्षत्र- अश्विनी १३l२५

  • योग - वज्र २१l३३

  • करण - कौलव १३l१४

  • दिनविशेष - उत्तम दिवस

आजचे राशिभविष्य

(ज्योतिषाचार्य: सारंग चिक्षे)

मेष - भावंडांचे प्रेम मिळेल, जवळचे प्रवास घडतील, उत्साह निर्माण होईल, उर्वरित कामे पूर्ण होतील,आवडते पदार्थ ग्रहण कराल, काहीतरी नवीन कार्ये करण्याची इच्छा होईल.

वृषभ - उत्तम द्रव्यलाभ होईल, घरगुती व्यवसायात तथा कार्यात छान फायदा होईल, व्यापार चांगलाच होईल, घरात आनंद साजरा कराल.

मिथून - स्नेही मित्रमंडळींची भेट होईल, संततीची चिंता राहील, स्थावर इस्टेट, जमीन, घर इत्यादी संबंधात काही मोठे निर्णय सध्या घेऊ नये.

कर्क - थोडासा थकवा जाणवेल, आरोग्याच्या तक्रारी जाणवतील, परंतु महत्वाची कामे नियमित तुम्ही स्वतःच कराल, शत्रूंपासून सावध राहावे. गृहसौख्याची चिंता भासेल, मातृसूख मिळेल.

सिंह - संतती सुख व पत्नी सूख मिळेल, भागीदारीत फायदा होईल, आवश्यक बदल करता येईल,आपल्या जोडीदारासह कोणताही व्यवसाय असतात त्यात उत्तम यश मिळेल.

कन्या - मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे, काही ठिकाणी सहन न होणारा एकटेपणा जाणवेल, अशावेळी अध्यात्माची मदत घ्यावी.वारसाहक्क किंवा वडिलोपार्जित संपत्तीची चिंता भासेल.

तूळ - राजकारणातील पराक्रम उत्तम फलदायी ठरेल, तीर्थयात्रा छान होतील,उच्च शिक्षणासाठी प्रयत्न कराल व फलास देखील येतील, आपल्या अधिकाराचा उत्तम मोबदला आपल्याला मिळेल.

वृश्चिक - व्यवसायात छान नफा होईल, आपल्या हळवेपणाचा लोक फायदा घेऊ शकतात सावध असावे, बाकी महत्वाची कार्ये संपन्न होतील.

धनु - काहीतरी विशेष कार्ये करून त्यात विशेष लाभ कमवाल, तसेच धनलाभ देखील होईल, व्यवसाय चांगलाच चालेल, जवळच्या मित्रांची भेट होईल, शेजारी लोकांशी संवाद होतील.

मकर - केलेलं श्रम व्यर्थ जाऊ शकतात लक्षपुर्वक कार्ये करावीत, मित्रांकडून फसवणुक होण्याची शक्यता दिसते, शक्यतो आपल्या महत्वपूर्ण विषय गुपित ठेवावे.

कुंभ - आरोग्य प्रतिकार शक्ती उत्तम असेल, अभ्यास चांगला होईल, छान मार्गदर्शन मिळेल, विशेष प्रवास व खरेदी होईल, चांगले मित्र भेटतील, कार्ये सावकाश होतील.

मीन - अनपेक्षित खर्च होऊ शकतो, लाभलेले द्रव्य सांभाळावे, स्वतः वर विश्वास ठेवून कार्ये हातात घ्या,विश्वास असेल तर सर्व कार्ये पार पडतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy 2024: गोव्याचे आजपासून मिशन सिक्कीम! मागच्या लढतीतील चुका टाळण्याचे आव्हान

BCCI T20 Tournament: गोवा महिला क्रिकेट संघाची दणदणीत कामगिरी! जम्मू-काश्मीरचा आठ विकेट राखून पराभव

Karnataka: मुरुडेश्वर मंदिरात बॉम्बस्फोट करण्याचा कट उधळला, कर्नाटकात सहा दहशतवाद्यांना अटक

CM Pramod Sawant: राष्ट्रीय प्रवासात 'गोवा' महत्त्वाची भूमिका बजावेल! मुख्यमंत्री सावंतांनी व्यक्त केला विश्वास

Sancoale News: क्विनीनगरात तणाव! 'रस्ता' प्रश्नावरून नागरिक आक्रमक'; आमदार वाझ यांची मध्यस्थी

SCROLL FOR NEXT