Rashi Bhavishya 5 October 2024 Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 5 October 2024: बिझनेसमध्ये धनप्राप्तीचा योग, पितृसुखाची छाया आणि खरेदीचा उत्तम संयोग; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

गोमन्तक डिजिटल टीम

आजचे पंचांग

  • शनिवार, ५ आक्टोबर २०२४, अश्विन शुक्ल पक्ष.

  • तिथि- तृतीया अहोरात्र.

  • रास- तूळ

  • नक्षत्र- स्वाती २१l३३

  • योग - विष्कंभ ३०l०८

  • करण - तैतिल १८l४३

  • दिनविशेष - वृद्धितिथी

आजचे राशिभविष्य

(ज्योतिषाचार्य: सारंग चिक्षे )

  • मेष

प्रवास तथा महत्त्वाची कार्ये होतील, उच्च शिक्षणासंदर्भात मार्ग मिळतील, वाहानसुख लाभेल, काही देवकार्य घडतील, धार्मिक कर्म करण्याची इच्छा होईल, साधारण प्रसन्न तथा सुखद दिवस असेल.

  • वृषभ

व्यवसाय/नोकरी संदर्भात स्पीड जरी कमी असेल तरीही लाभ मात्र उत्तम होईल, कामासंदर्भात जवळचे प्रवास घडतील, बिझनेस मधून छान लाभ आहे, पितृसुख मिळेल, सुंदर कार्य घडतील, खरेदी करण्यास हरकत नाही.

  • मिथून

आज अधिक प्रयत्नातून उत्तम लाभ आहे, मनापासून कार्ये होतील, लाभदायक प्रवास असतील तरीही वाहने सावकाश चालवावित,प्रिय मित्रांची भेट होईल, महत्त्वपूर्ण वस्तू प्राप्त होतील, फसवणुक होण्याची शक्यता आहे त्यामुळे सावधानता बाळगावी.

  • कर्क

व्यवसायात/नोकरीच्या ठिकाणी कितीही काम केले तरी व्यर्थ जात आहे असे वाटत असेल तर ते चुकीचे आहे,काही काळातच उत्तम लाभ दर्शवत आहे,त्यामुळे असे विचार करून मानसिक स्थिती बिघडवून घेऊ नये.आरोग्य सांभाळावे.

  • सिंह

प्रसन्नतेचे भाव निर्माण होतील, कौटुंबिक सुख प्राप्त होईल, आवडत्या नातेवाईकांची भेट होईल,खर्च वगैरे होतील परंतु चांगल्या ठिकाणी होईल, बाहेरील द्रव्य पदार्थ खाणे टाळावे,आरोग्याची काळजी असावी.

  • कन्या

धनप्राप्तीसाठी कष्ट तर घ्यावेच लागतील परंतु स्वधिकाराने धनप्राप्तीचे सुख आज मिळेल,खर्च मात्र जपुन करावा त्यात आपले नियंत्रण नसेल, आरोग्य सांभाळणे दवाखाना होण्याची शक्यता दिसते,द्विधा मनस्थिती होत असल्यास योग, सूर्योपासना करावी.

  • तूळ

शेजार किंवा जवळच्या लोकांकडून उत्तम लाभ दिसतो,काहीतरी नवीन कार्ये करण्याची इच्छा जागृत होईल, सुंदर प्रवास घडेल, खाण्यापिण्याच्या संदर्भात सुख प्राप्त होईल, वाहन सुख आहे,साधारण सुखद दिवस असेल.

  • वृश्चिक

घरामध्ये चांगल्या घटना घडतील, आज साधारण घरातच अधिक सुख प्राप्त होईल,घरातील लोकांसाठी खर्च होईल, प्रसन्नता तथा शांतता, आनंद प्राप्त होईल,उत्तम प्रकारे विषेश अभ्यास आज होईल, घरची कामे उत्तम प्रकारे होतील.

  • धनु

बहिण/भावंडे यांच्या कडून काहीतरी लाभ दिसतो, स्नेही जनांची भेट होईल, आजच्या कामात उत्तम यश तथा नफा मिळेल,शेजारी तथा जवळच्या नातेवाईकांकडून मदत तथा लाभ संभवेल.

  • मकर

जरा विश्रांती घ्या कारण तुमचे थोडे काम कमी होण्याची शक्यता आहे अर्थात तुमचे काही काम समोरचा व्यक्ती करेल, ताणतणाव थोडा कमी जाणवेल, मानसिक दृष्ट्या सुख अनुभवाल, आरोग्य मात्र सांभाळावे दूषित पाण्याने आजार होण्याची शक्यता आहे.

  • कुंभ

स्त्रीकडून मदत घेतल्याने कार्य पूर्ण होतील, पत्नीकडून लाभ, व्यवसायाच्या ठिकाणी छान फायदा होईल,कोर्टकचेरी किंवा पार्टनरशिप या संदर्भात निर्णय घेऊ नये.बदलीसाठी छान दिवस,प्रवास देखील उत्तम होईल.

  • मीन

सर्वप्रथम तर आज वाहने लक्षपूर्वक चालवीत, महत्त्वाकांक्षा कमी होऊ देऊ नका.मन परिवर्तन न झाल्याने नियमित असलेले कार्य निश्चितच पूर्ण होतील परंतु मानसिक स्थिती ठीक नसेल तर कार्य अपूर्ण राहण्याची संभावना दिसते,त्यामुळे झालेल्या गोष्टी विसरण्याताच सुख आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: हिंदुत्ववादी संघटनांचे वेलिंगकरांना समर्थन, ख्रिस्ती समाजाकडून अटकेची मागणी; राज्यभरात मोर्चे

Sunburn Festival 2024: सनबर्नविरोधात कामुर्लीत स्थानिकांचा कडक विरोध; उद्याची बैठक ठरणार निर्णायक!

Mhadei Water Dispute: ...कर्नाटकाविरोधात लढण्यास सावंत सरकार ठरले कुचकामी; आलेमाव यांचा घणाघात

Goa Navratri 2024: छत्रपती शाहू महाराजांच्या सातारा दरबारातील सरदाराने गोव्यात बांधलेले एकमेव मंदिर

Goa Crime News: पैशांसाठी मित्रांचा खून करणारा काजीदोनी दोषी; संशयिताची बाजू ऐकून कोर्ट ठोठावणार शिक्षा

SCROLL FOR NEXT