Daily Horoscope 10 October 2024 Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 10 October 2024: अडलेली कामं पूर्ण होतील, पैसेही परत मिळण्याची शक्यता; जाणून घ्या कोणत्या राशीसाठी ठरेल आजचा दिवस खास!

गोमन्तक डिजिटल टीम

आजचे पंचांग

गुरूवार,१० आक्टोबर २०२४, अश्विन शुक्ल पक्ष,

  • शरद ऋतु,क्रोधी नाम संवत्सर,शके १९४६.

  • तिथि- सप्तमी १२l३२( सरस्वती पूजन)

  • रास- धनु

  • नक्षत्र- पूर्वाषाढा २९l४१

  • योग - अतिगंड २८l३७

  • करण - वणिज १२l३२

  • दिनविशेष - १३ प.चांगला

आजचे राशिभविष्य

(ज्योतिषाचार्य सारंग चिक्षे)

मेष - आज निवांत वेळ मिळेल परंतु एकटेपणा जाणवेल, थोडक्यात अस्वस्थ मन राहील.

वृषभ - परिवारासह दूरचा प्रवास होऊ शकतो,कदाचित कुलदेवतेची यात्रा संभवेल,उत्तम वाहन सुख लाभेल.

मिथून - नोकरी/व्यवसायाची अडलेली सर्व कामे नियमित पार पडतील. घरातून पूर्ण मदत मिळेल,व्यवसायाच्या ठिकाणी काही विशेष बदल दिसेल.

कर्क - दिलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे विशेष करून मित्र किंवा चुलत्यांकडून दिलेले पैसे वापस मिळतील किंवा त्यांच्याकडून काही लाभ होईल.

सिंह - महत्त्वाचे निर्णय टाळावेत,विशेष करून प्रवासासंदर्भातील असेल तर निश्चीतच टाळावा .

कन्या - राजकारणा संदर्भात काहीही निर्णय घेऊ नये, व्यवसायात काही अडचणी येण्याची संभावना आहे.

तूळ - स्नेही लोकांची भेट होईल,स्नेही लोकांसाठी खरेदी कराल,आज कुटुंबातील लोकांसमवेत आनंद साजरा कराल.

वृश्चिक - मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे कदाचित आरोग्य संदर्भातील तक्रारी जाणवतील, काही ठिकाणी व्यर्थ चिंता लागेल.

धनु - घरासाठी तुम्ही कष्टपूर्वक जे कार्य करीत आहात त्याचे योग्य फल मिळण्याचा दिवस आहे.

मकर - आज कुटुंबांसाठी वेळ द्याल, मुलांसाठी किंवा घरातील आपल्या स्नेही व्यक्तीसाठी विशेष खरेदी कराल.

कुंभ - सध्या आपली उर्जा किंवा आपण केलेली मेहनत अर्थात जे काही आपण नवीन कार्य केलेले आहे ते जगाला दाखवू नका योग्य वेळ येताच ते प्रगट करा.

मीन - साधारण दिवस असेल अर्थात अधिक नफा ही होणार नाही किंवा अधिक नुकसान पण दिसणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: वेलिंगकरांना दिलासा, पोलिसांसमोर हजर होणार!

Colvale Jail: वास्तव अन् दाहकता! तुरुंगातील वाढती अराजकता अन् माजलेली बजबजपुरी जीवघेणी

Goa Accident: ट्रिप जीवावर बेतली! मध्य प्रदेशातील तरुण गोव्यात बुडाला; तोणीर-काजरेघाट धबधबा धोकादायक

Goa Literacy Campaign 2024: येत्या मुक्तीदिनापूर्वी गोव्याला साक्षरतेत स्वयंपूर्ण करण्याचं ध्येय; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला मानस!

Balarath Yojana: बालरथ योजनेला दूषणं देणं चुकीचं, पालक-विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर; शिक्षणतज्ज्ञ नाडकर्णींचं मत

SCROLL FOR NEXT