Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

Yuri Alemao: एस्कॉर्ट संकेतस्थळांवरून आलेमाव यांची सरकारवर घणाघाती टीका! पोलिसांनी फेटाळला आरोप

Yuri Alemao About Escort Services Sites: राज्याच्‍या बदनामीस करण ठरत असलेला वेश्‍‍याव्‍यवसाय आणि त्‍यास खतपाणी घालणारी ‘एस्‍कॉर्ट’ सेवा देणारी संकेतस्‍थळे बंद करण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्याच्‍या बदनामीस करण ठरत असलेला वेश्‍‍याव्‍यवसाय आणि त्‍यास खतपाणी घालणारी ‘एस्‍कॉर्ट’ सेवा देणारी संकेतस्‍थळे बंद करण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला. दरम्‍यान, गोवा पोलिसांनी हा आरोप खोडून काढताना अशा प्रकारांवर कारवाई सुरूच आहे, असे स्‍पष्‍ट केले.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आलेमाव यांनी म्हटले आहे की, गोव्यात ‘एस्‍कॉर्ट’ सेवा देणारी शेकडो अश्‍‍लील संकेतस्‍थळे आहेत. त्यावर फोन नंबर आणि ठिकाणे दिलेली असतात. त्‍यामुळे गोव्‍याची बदनामी होत आहे. अशा संकेतस्थळांवर कारवाई करण्‍यास सरकार अपयशी ठरले आहे. त्‍यामुळे राज्याची समृद्ध संस्‍कृती नष्‍ट होत चालली आहे.

आमच्या मुली-बहिणींना संध्याकाळी घराबाहेर पडता येणे कठीण झाले आहे. काही पर्यटकांकडूनही स्थानिक मुलींना छेडण्‍याचे प्रकार होऊ लागले आहेत. ते बेशिस्त वागण्याचे धाडस करतात, कारण या संकेतस्थळांवर गोव्याला ‘एस्कॉर्ट’ सेवेचे केंद्र म्हणून दाखविण्याचा प्रयत्न होत आहे. सरकारने डबल इंजिनाचा वापर करून असे प्रकार रोखण्याची गरज आहे, असेही युरींनी म्‍हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhandari Samaj Goa: अशोक नाईक गटाला दिलासा, संस्था महानिरीक्षकांचा निवाडा रद्दबातल; भंडारी समाजातील संघर्ष

गोव्यात सौंदर्य, पर्यावरण टिकवणाऱ्या उपक्रमांची अत्यंत आवश्यकता, स्थानिकांमुळेच राज्याच्या प्रेमात; कॅथरीना

Desmond Costa Goa Revolution: ठाम उभे राहून क्रांती करण्याची गरज... गोव्यातील तरुणांनी संघटना उभारावी

Goa Live Updates: 'ज्यांची बाजू खोटी असते तेच...'; कळसा-भांडूरा प्रकल्पप्रकरणी सुभाष शिरोडकरांचा हल्लाबोल

Goa Politics Bhutani Project: भूतानी प्रकल्पावरुन राजकारण तापलं, ज्येष्ठ नागरिकांचे पाच दिवसापासून उपोषण; आक्रमक आलेमावांनी मागितला मुख्यमंत्र्यांचा राजीनामा

SCROLL FOR NEXT