Goa Board
Goa Board 
गोवा

यंदा मास्क घालूनच दहावीची परीक्षा

Dainik Gomantak

पणजी

गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले. या खेपेला प्रत्येक केंद्रावर सॅनिटायझर्स व कोणत्याही विद्यार्थ्याने वा कर्मचाऱ्याने मुखावरणे (मास्क) न आणल्यास त्यांना ती पुरवली जाणार आहेत. परीक्षेच्या पूर्वी प्रत्येक वर्गखोलीचे निर्जुंतुकीकरण केले जाणार आहे. पालकांना परीक्षा केंद्रापासून दोनशे मीटर लांबवरच थांबवले जाणार आहे. इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर विद्यार्थ्यांना वर्ग खोलीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी दोन स्वयंसेवक नेमले जाणार आहेत. यंदा दहावीच्या परीक्षेसाठी उच्च माध्यमिक शिक्षकांचीही मदत पर्यवेक्षणासाठी घेतली जाणार आहे. पालक शिक्षक संघालाही यात सामावून घ्या अशी सूचना मंडळाने मुख्याध्यापकांना आज जारी केलेल्या परिपत्रकातून केली आहे.
मंडळाने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक असे २१ मे- घरगुती वायरींग, इलेक्ट्रॉनिक्स, कुकरी, कपडे कापणे व शिवणे, कपड्यांचे डिझायनिंग करणे, अन्न प्रक्रीया, बेकरी, बागकाम, घऱगुती वायरींग, मराठी व इंग्रजी माध्यमातून बेसिक कुकरी, २२ मे- ऑचोमोबाईल्स, माहिती तंत्रज्ञान तसेच माहिती तंत्रज्ञानावर आधारीत सेवा,रिटेल, सौंदर्यशास्त्र, ॲपारेल, बांधकाम, शेती, दूरसंचार, लॉजीस्टीक्स, पर्यटन व आतिथ्यशीलता, इलेक्टॉनिक्स व हार्डवेअर, प्लंबिंग, आरोग्याची काळजी, प्रवास व पर्यटन, शारिरीक शिक्षण, माध्यम करमणुक, बॅंकींग वित्तीय सेवा, भाजीपाला लागवड, मराठी व इंग्रजी माध्यमातून कापड कापणे व शिवणे. २३ मे- प्रथम भाषा- इंग्रजी, मराठी, उर्दू, सीडब्ल्यूसएनसाठी फंक्शनल इंग्रजी व फंक्शनल मराठी. २६ मे- मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यमासाठी गणित, सीडब्ल्यूएसएनसाठी गणित, दैनंदिन गणित. २७ मे- द्वितीय भाषा हिंदी, फ्रेंच, सीडब्ल्यूएसएनसाठी फंक्शन हिंदी, द्वितीय भाषाक कंपोसिटसाठी हिंदी-मराठी, हिंदी- संस्कृत, हिंदी- पोर्तुगीज, हिंदी - अरबी आणि हिंदी- फ्रेंच. २८ मे- तृतीय भाषा- इंग्रजी, कोकणी, मराठी, उर्दू, संस्कृत, कानडी, अरबी, फ्रेंच, पोर्तुगीज, फंक्शनल इंग्रजी, फंक्शनल कोकणी, फंक्शनल मराठी. २९ मे- समाजशास्त्र १ (इंग्रजी, मराठी व उर्दू माध्यम), सीडब्ल्यूएसएनसाठी इतिहास व राज्यशास्त्र (मराठी व इंग्रजी माध्यम). ३० मे-  समाजशास्त्र २ (मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यम), सीडब्ल्यूएसएनसाठी भूगोल व अर्थशास्त्र (इग्रंजी व मराठी माध्यम). १ जून - विज्ञान (मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यम), सीडब्ल्यूएसएनसाठी सर्वसाधारण विज्ञान. २ जून- सीडब्ल्यूएसएनसाठी चित्रकला व रंगकाम. ३ जून- सीडब्ल्यूएसएनसाठी वर्ड प्रोसेसिंग, ४ जून -सीडब्ल्यूएसएनसाठी मुलभूत फुलोत्पादन, ५ जून- सीडब्ल्यूएसएनसाठी बेकरीची मुलतत्वे,  ६ जून- सीडब्ल्यूएसएनसाठी डेस्कटॉप प्रकाशन.
बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक असे- २० मे द्वितीय भाषा मराठी, सीडब्ल्यूएसएनसाठी मराठी भाषा २, २१ मे-  राज्यशास्त्र, सीडब्ल्यूएसएनसाठी राज्यशास्त्र, २२ मे-  भूगोल, सीडब्ल्यूएसएनसाठी भूगोल.
मंडळाने परिपत्रकात म्हटले आहे, परीक्षेपूर्वी अर्धातास विद्यार्थ्यने वर्गखोलीत उपस्थित असणे आवश्यक आहे. परीक्षा सुरु झाल्यानंतर त्याला अर्धा तास परीक्षा वर्गखोली सोडता येणार नाही.  समाज अंतर पाळून, मुखावरण वापरून परीक्षा केंद्रावर सर्वांनी वावरावे . प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षा केंद्र, उपकेंद्र, वर्ग खोली याची माहिती मुख्याध्यापकांनी उपलब्ध करून दिली पाहिजे. परीक्षा संपल्यावर एकेक वर्गखोलीतील विद्यार्थ्यांना क्रमाने बाहेर सोडले जाणार, सर्व वर्गखोल्यांतील विद्यार्थ्यांना एकाचवेळी सोडले जाणार नाही. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: पणजीच्या पोटात दडलंय तरी काय? खोदकामात सापडली आणखी एक रहस्यमय मूर्ती

Goa Congress : निष्ठावंत कार्यकर्ते, प्रतिनिधींची वानवा; काँग्रेसची मोठी पंचाईत

Bicholim News : गोव्याच्या अस्तित्वासाठी झटणार : ॲड. रमाकांत खलप

Karnataka Sex Scandal Case : कर्नाटकातील सेक्स स्कँडल प्रकरणाचा गोव्यावर परिणाम नाही : सदानंद तानावडे

Goa Today's Live News:सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत - अमित पाटकर

SCROLL FOR NEXT