Ponda  Dainik Gomantak
गोवा

Ponda News : लेखकांनी विषय सोपा करून मांडावा : गजानन देसाई

गोमन्तक डिजिटल टीम

Ponda News :

फोंडा, एखादा कठीण, दुर्बोध विषय सोप्या पद्धतीने वाचकांना समजेल आणि उमजेल अशा भाषेत साहित्यिकाने आज मांडण्याची गरज आहे. साहित्यिकांनी चतुरस्त्र वाचनाची आस धरून सकस साहित्य वाचकांपर्यंत पोचवायला हवे, असे विचार प्रागतिक विचार मंचच्या सतराव्या मराठी साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष म्हणून साहित्यिक गजानन देसाई यांनी व्यक्त केले.

फोंड्यातील विठ्ठल रखुमाई सभागृहात आज (रविवारी) प्रागतिक विचार मंचतर्फे हे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाचे उद्‍घाटक म्हणून ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी तसेच मराठी भाषाभिमानी आणि माजी आमदार रोहिदास नाईक, तसेच विशेष अतिथी म्हणून पत्रकार सागर जावडेकर, इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा संस्थेचे अध्यक्ष दशरथ परब, कार्याध्यक्ष बाबलो पारकर, स्वागताध्यक्ष महेश पारकर, संस्थापक अध्यक्ष रमेश वंसकर, अध्यक्ष जयवंत आडपईकर, कोषाध्यक्ष राया बोरकर तसेच सचिव विनोद नाईक आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

गजानन देसाई म्हणाले की, आपल्याला जे ठाऊक आहे ते व्यक्त होण्यासाठी लिहिले पाहिजे. आज वाचनाची आवड कमी होत चालली आहे. मुलांपर्यंत युवा पिढीपर्यंत ही वाचन संस्कृती पोचली पाहिजे.

उद्‍घाटक रोहिदास नाईक म्हणाले की, मराठी ही आपली राजभाषा आहे, आणि तिला मानाचे स्थान हे मिळायलाच हवे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी जागवलेला स्वाभिमान आज युवा पिढीत दिसायला हवा.

पत्रकार सागर जावडेकर म्हणाले की, मराठीच्या उत्कर्षासाठी काम करताना समाजाला दिशा देण्याचे कार्य साहित्यिकांनी करायला हवे. ’

दशरथ परब म्हणाले की, साहित्याच्या आणि साहित्यिकांच्या उत्कर्षासाठी प्रागतिक विचार मंचकडून भरीव प्रयत्न होताना दिसत आहेत. बाबलो पारकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर स्वागताध्यक्ष महेश पारकर यांनी स्वागत केले. प्रास्ताविक जयवंत आडपईकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. अनिता तिळवे यांनी केले तर रमेश वंसकर यांनी आभार मानले.

विविध पुस्तकांचे प्रकाशन :

यावेळी विनोद नाईक यांच्या निर्माल्य, महेश पारकर यांच्या ‘कोंदण’, लक्ष्मी जोग यांच्या ‘सरमिसळ’, जीतेंद्र फडते यांच्या ‘थरार’ तसेच संदीप बोरकर यांच्या ‘ओंजळी’ आणि नारायण खोर्जुवेकर यांच्या ‘हर्षगंधा’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

मान्यवरांचा सत्कार

गो. रा. ढवळीकर, उषा हजारे तसेच सुनील सावकर यांचा सत्कार करण्यात आला. गो. रा. ढवळीकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मराठीला राजभाषेचे स्थान मिळवून देण्यासाठी सर्वांनी संघटीत प्रयत्न करूया, असे आवाहन केले.

परिसंवाद रंगले

‘वाचन संस्कृतीवरील आव्हानांना सामोरे जाताना’ वरील परिसंवाद झाला. पत्रकार राजू भि. नाईक या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी होते तर राजमोहन शेट्ये, डॉ. प्राची जोशी तसेच शर्मिला प्रभू सहभागी झाल्या होत्या. ‘गोव्यातील मराठी भाषा संवर्धनाची स्थिती’ या विषयावर पत्रकार मयुरेश वाटवे यांच्या अध्यक्षस्थानी झालेल्या परिसंवादात डॉ. स्नेहा म्हांबरे, श्रुती हजारे आणि डॉ. विनय मडगावकर सहभागी झाल्या होत्या. शेवटच्या सत्रात कवी संमेलन झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

SCROLL FOR NEXT