पेळावदा रावण येथे सामूहिकरित्या शेतीची राखण करणारे महादेव गावस, विठ्ठल मोरजकर, मनोहर माईणकर व राजेंद्र जाधव  Dainik Gomantak
गोवा

Goa:'काटेकणगीची' सामूहिकरीत्या राखण करण्याचा प्रेरणादायी प्रयत्न

जंगली प्राण्यांच्या हैदोसामुळे शेती करणे हे नुकसानकारक बनली आहे. शेतात उगवलेले कोणतेही पीक जंगली प्राण्याकडून फस्त केले जाणे अशी परिस्थिती सद्य या भागात आहे.

दशरथ मोरजकर

आमचे पूर्वज शेतीवरच (Farm) अवलंबून होते. आम्ही ही शेती करतो आणि त्यातूनच आमचे कुटुंब चालवतो. जंगली प्राण्यांच्या हैदोसामुळे शेती करणे हे नुकसानकारक बनली आहे. शेतात उगवलेले कोणतेही पीक जंगली प्राण्याकडून फस्त केले जाणे (Animals has made farming harmful) अशी परिस्थिती सद्य या भागात आहे.

काटे कणगाची शेती

आमच्या भागात 'काटेकणगा'ची उत्तम पीक येते. इथली काटेकणगी खूपच रुचकर असल्याने त्यांना मोठी मागणी आहे. यातून आम्हाला चांगली उत्पन्न मिळते. पण रानडुक्करासमोर काटेकणगाची शेतीचे चालत नाही. तुम्ही कितीही लाकडी कुंपण केले तरीही रानडुक्कर येऊन तुमचे काटेकणगी, कारांदे, सुरण अशी कंदमुळांची पिके फस्त करतात, आणि तुमच्या सर्व मेहनतीवर पाणी फेडतात. यातून मोठी नुकसान होते. चार महिन्याच्या या पिकाला रानडुक्कराना नुकसान करण्यासाठी एकच दिवस बस.

अशी समस्या आम्हा शेतकऱ्यांसाठी नित्याचीच बनली आहे. पण शेतीवरच आमचे कुटुंब चालत असल्याने शेती सोडून कसे होणार. ती तर आम्हाला करायलाच हवी. आणि फायद्याची असलेली काटेकणगाची शेती का म्हणून सोडायची. त्यामुळे आम्ही निश्चय केला. अनेकांनी मिळून एकाच ठिकाणी शेती करायची आणि तिची सामूहिकरीत्या राखण करावी. शेवटी आम्हाला येथील एका जमिनीदाराने शेतीसाठी जमीन दिली आणि त्यात आम्ही सहा जणांनी काटेकणगी व इतर लागवड केली आहे. आता या शेतीच्या ठिकाणी मचाण( माळो) उभारून त्यातून आम्ही रात्रीच्या वेळी शेतीची राखण करीत असल्याचे सांगतात.

काटे कणगाची राखण करण्यासाठी उभारलेले मचाण

अशी ही जिद्दीची कहाणी आहे सत्तरीतील पेळावदा रावण येथील सहा शेतकऱ्यांची आहे. महादेव गावस, राजेंद्र जाधव, विठ्ठल मोरजकर, मनोहर माईणकर, मडसो हिंदे व कविता जाधव अशी या सहा शेतकऱ्यांची नावे आहे.

या सर्वांनी येथील सुमारे दीड एकर जमिनीत आपली स्वतंत्रपणे काटेकणगी व इतर भाजी पाल्याची शेती फुलवली आहे. रानटी प्राण्यांच्या होणारा हैदोस रोखण्यासाठी त्यांनी आपल्या या लागवडीची सामूहिकरित्या राखण करीत आहे. यासाठी त्यांनी शेतमळ्याच्या सभोवताली पाच मचाण उभारले आहे. आणि दर रात्री ते मचाणावर जाऊन आपल्या शेतीची राखण करतात.

याबद्दल ते सांगतात, आम्ही या शेताच्या चार बाजूंनी पाच मचाण उभारलेले आहे. दररोज रात्रीच्या वेळी न चुकता( सणासुदीत सुध्दा) आम्ही येथे मचाणावर येऊन शेतीसाठी पाहारा देतो. आम्ही सहा पैकी कधी तिघे तर कधी चौघे मिळून मचाणावर आलटून पालटून येतो आणि रात्रभर शेतीची राखण करतो. आमची ही राखण सामूहिक पध्दतीची आहे. एखाद्या दिवशी एकटा घरी राहिला तर त्याचे शेत इतरांकडून राखले जाते. चार बाजूनी चार जण असल्याने रानडुक्करावर सर्व बाजूंनी पाळत ठेवता येते. तसेच रात्रीच्या वेळी आम्हाला एकमेकांचा आधार होतो असे त्यांनी सांगितले.

काटे कणगाची शेती

हे शेत गावापासून बरेच लांब डोंगराच्या पायथ्याशी असल्याने एकट्याने येथे शेती करणे सोयीचे ठरत नाही. त्यामुळे या सहा जणांनी मिळून मिळून काटेकणगी व चिबुड, काकडी, आले, कारांदे, झेंडू आदींची शेती केली आहे. त्याची राखण ते सामूहिकरीत्या करतात. त्यांनी अजूनपर्यत रानडुक्करापासून शेतीची राखण करण्यास यशस्वी झाल्याचे सांगतात.

आज सत्तरीतील ग्रामीण भागात शेती करणे हे नुकसानग्रस्त ठरत असताना पेळावदा येथील शेतकरी निराश व हतबल न होता जोमाने शेत उत्पन्न घेण्यासाठी वावरत आहे. त्यामुळे त्यांचा हा प्रयत्न प्रेरणादायी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Narendra Modi Goa Visit: मोदींची दिवाळी यावर्षी 'गोव्यात'! नौदल जवानांसोबत उत्‍सव करणार साजरा; ‘ऑपरेशन सिंदूर’च्या आठवणींना उजाळा

Mhaje Ghar: ...तर ‘माझे घर’ योजनेचे लाभार्थी पडतील त्रासात! विरियातोंचा गंभीर इशारा; सरकारच्‍या धोरणांवर साधला निशाणा

Goa Politics: खरी कुजबुज; रवींच्‍या व्‍हिजनवर गोविंदांची वाटचाल

Goa Education: 'यापुढे कठीण प्रश्‍‍नपत्रिका न देण्‍यावर भर देऊ'! तिसरीच्या प्रश्नपत्रिकेवरून गोंधळ, SCERT संचालकांचे प्रतिपादन

Who After Ravi Naik: फोंड्यातील पोटनिवडणुकीवरून भाजपसमोर पेच! रवी नाईक यांचे कनिष्‍ठ सुपुत्र 'रॉय' यांच्या नावाचाही आग्रह

SCROLL FOR NEXT