Gun Dainik Gomantak
गोवा

Goa Firing: दिल्लीच्या नेमबाज खेळाडूंनी गोव्यात गोळीबार का केला, सराईत गुंडाशी वादाचे प्रकरण काय?

Goa Firing Case: या प्रकरणातील गरडचे इतर साथीदार फरार आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: दिल्लीहून राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेच्या पात्रता फेरीसाठी गोव्यात दाखल झालेल्या खेळाडूंसोबत पार्किंगच्या वादातून म्हापशातील एका हिस्ट्रीशीटरने त्यांच्यासोबत हुज्जत घातली. यावेळी नेमबाजी स्पर्धेतील विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षकाने स्वसंरक्षणार्थ हवेत गोळीबार केला.

यावेळी एकाच्या अपंगत्वावरून संबंधितास धमकी देत शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी सराईत गुंड शैलेश गरड व त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा नोंद केला. तसेच गरडला पोलिसांनी नंतर अटक केली.

या प्रकरणातील गरडचे इतर साथीदार फरार आहेत. म्हापसा पोलिसांच्या माहितीनुसार, हा प्रकार २३ रोजी, रात्री ११.४५ च्या सुमारास घडला. याप्रकरणी विशाल शौकीन (२२, दिल्ली) हे फिर्यादी आहेत. विशाल शौकीन हे प्रशिक्षक असून ते दोन विद्यार्थ्यांसोबत गोव्यात उतरले होते.

मांद्रे येथील एका शूटिंग अकादमीस्थळी राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेची पात्रता फेरी सुरू आहे. शुक्रवारी रात्री शौकीन हे विद्यार्थ्यांसोबत करासवाडा, म्हापसा येथे जेवण करण्यासाठी रेंट-अ-कारने आले होते.

प्रशिक्षकांना मारहाण आणि धमकी

अनपेक्षितपणे मारहाण झाल्यामुळे शौकीन है घाबरले. कारण नवख्या जागेत त्यांच्यासोबत गुंडगिरी सुरू होती तसेच त्यांच्यासोबत दोन विद्यार्थीही होते.

त्यात एकजण अल्पवयीन (१७ वर्षीय) होता. त्यामुळे शौकीन यांनी एअर पिस्तुल काढून हवेत झाडले. संशयितास घाबरविण्यासाठी तसेच स्वसंरक्षणासाठी त्यांनी हवेत गोळीबार केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gas Cylinder Seizure: 1021 पैकी 485 सिलिंडर रिकामे, वजनमाप खात्‍याकडून मोजणी; अहवाल मिळाल्‍यानंतर पोलिस करणार कारवाई

UTAA: ‘उटा’ 8 संघटनांनी एकत्र येऊन स्‍थापलेली संस्‍था नव्‍हे! ती 14 व्यक्तींनी केलेली सोसायटी; प्रकाश वेळीप यांचा दावा

Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार पाण्यावरची टॅक्सी! कोचीचे पथक करणार पाहणी; प्रवाशांना मिळणार नवा पर्याय

Goa News Live: सराईत गुंड 'टारझन' विरोधात हत्यार कायद्याखाली गुन्हा; अड्डयावर सापडली तलवार

Goa Politics: खरी कुजबुज; पैशांसाठी भारतीय स्त्रिया बनल्या विधवा?

SCROLL FOR NEXT