When will the land ownership issue of Kendriya Navodaya Vidyalaya in Walpai be resolved
When will the land ownership issue of Kendriya Navodaya Vidyalaya in Walpai be resolved 
गोवा

वाळपईतील केंद्रीय नवोदय विद्यालयाचा जमीन मालकी विषय सुटणार कधी?

गोमन्तक वृत्तसेवा

वाळपई : वाळपई मासोर्डे येथील केंद्रीय नवोदय विद्यालयाचा जमीन मालकीचा प्रश्न आजही प्रलंबित असून मालकी विषय एैरणीचा बनलेला असून विद्यालयाच्या संरक्षण कुंपणाचे काम न्यायालयाच्या कचाट्यात सापडलेले आहे. त्यामुळे तुर्तास हे काम करता येणार नाही अशी माहीती सुत्रांकडून मिळालेली आहे. मात्र पालकांनी पणजी उच्च न्यायालयात किमान शाळेची दुरुस्ती करण्यास परवानगी द्यावी अशी याचिका दाखल केल्यानंतर पालकांचा विजय झाला होता. व गेल्या वर्षापासून नवोदय विद्यालयाच्या शाळेचे दुरुस्ती काम हाती घेण्यात आले आहे. त्यातील बरेचसे शाळेची डागडूज झालेली आहे. आता दुसर्या टप्यातील कामही मार्गी लागले आहे अशी माहीती प्रमुख याचिकादार पालक श्री. सुबोध देसाई यांनी दिली आहे. मात्र शाळेच्या सुरक्षिततेच्या बाबतीत कुंपणाचे काम करणे आवश्यक आहे. जमीन मालकीचा विषय पूर्ण झाल्यानंतरच कुंपणाचे काम करता येईल असा विचार न्यायालयाने प्रकट केला आहे. सरकार या विद्यालयाच्या जमीन मालकी विषयी गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मालकी मिळणे दूर बनले आहे. मालकी मिळत नसल्याने कुंपणाचे काम रखडलेले आहे. या नवोदय विद्यालयाच्या बाजूलाच जंगल आहे.

याआधी बिबट्या वाघाचे दर्शन झालेले आहे. सद्य स्थितीत कुंपण अनेक ठिकाणी मोडलेले आहे. त्यामुळे जंगली जनावरे विद्यालयाच्या आवारात येण्याची भिती वाढली आहे. त्यासाठी चारही बाजूंनी भक्कम कुंपण बांधणे आवश्यक आहे. पण सद्या जमीन मालकी विषय न्याय प्रविष्ठ आहे. पहिले अपील नवोदयचे केस नंबर ३०७/२००५ व दुसरे गोवा राज्य सरकारचे २८/२००६ हे गेली पंधरा वर्षे हा ज्वलंत विषय भिजत पडलेला आहे. तो विषय मार्गी लागला तरच कुंपण बांधता येणार आहे. दरम्यान पालक शिक्षक संघटनेने आॅक्टोंबर २०१६ साली निदान शाळेच्या इमारतींची दुरुस्ती करावी अशी याचिका पणजीत उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल केली होती. त्यावर अनेक सुनावण्या होऊन न्यायालयाने इमारतींची दुरुस्ती करावी असा निर्णय दिला होता. त्यानंतर दुरुस्ती कामाची प्रक्रिया हाती घेऊन निविदा काढून आता दुरुस्ती काम सुरु आहे. त्यासाठी उत्तर प्रदेशातील जलनिगमला कामाचे कंत्राट देण्यात आले आहे. दुरुस्तीचे बरेचसे मोठे आवश्यक काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. पण विद्यालयाच्या चारही बाजूंनी कुंपणाचे काम करणे महत्वाचे आहे. हे विद्यालय निवासी आहे. येथे मुलामुली, शिक्षक वर्ग निवास करतात.

त्यासाठी विद्यालयाला सुरक्षा पुरविणे सरकारचे कर्तव्य आहे. पालक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व प्रमुख याचिकादार श्री. सुबोध देसाई म्हणाले जमीन मालकीची सुनावणी उच्च न्यायालयात सुरु आहे. इमारतींचे दुरुस्ती काम अंतिम टप्यात आहे. पण विद्यालयाला सुरक्षा नाही. सन्माननीय उच्च न्यायालयाने जोवर मालकी विषय सुटत नाही तोवर कुंपणाचे काम करता येणार नाही असे सुचीत केले आहे. त्यामुळे सरकारी अनास्थेमुळे विद्यालयाचे भवितव्य टांगणीला आहे. त्यामुळे न्यायालयात जो निर्णय होईल त्याची प्रतिक्षा लागून आहे. तो आता केव्हा सुटतो याची हुरहुर लागली आहे. सरकार काही दराने रक्कम जमीनीवर दावा केलेल्या याचिका दाराला देण्यास तयार होते. पण तो दर याचिका दाराला मान्य नाही अशी स्थिती बनलेली आहे. त्यामुळे जमीन मालकीचे घोडे अडले आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Show Cause Notice: सात दिवसांत स्पष्टीकरण द्या! बेकायदा शुल्क आकारणी प्रकरणी मुष्टिफंड हायस्कूलला नोटीस

Kyrgyzstan Violence: किर्गिस्तानमध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला; परराष्ट्र मंत्रालयाकडून भारतीय विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन नंबर जारी

Pakistan Road Accident: पाकिस्तानातील पंजाबमध्ये भीषण अपघात; 5 मुलांसह एकाच कुटुंबातील 13 जणांचा जागीच मृत्यू

Taxi Driver Assault: कळंगुट येथे मद्यधुंद पर्यटकांचा स्थानिक टॅक्सीचालकावर हल्ला, पाचजण ताब्यात

Goa Monsoon 2024: आनंदवार्ता! गोव्यात पाच जूनला मॉन्सून हजेरी लावणार

SCROLL FOR NEXT