Hindu Raksha Mahaaghadi  Dainik Gomantak
गोवा

Frontispiece Church: 'ही जागा आम्हाला अयोध्येसारखी, चर्चच्या घशात जाऊ देणार नाही'; हिंदू रक्षा महाआघाडी आक्रमक

Frontispiece Church Sancoale Controversy: हिंदू रक्षा महाआघाडी लवकरच चर्चसंस्थेच्या वारसा स्थळ ताब्यात घेण्याच्या कारवायांविषयी राज्यस्तरावर जनजागृती करणार आहे.

Pramod Yadav

Frontispiece Church Sancoale Controversy

पणजी: चर्च संस्था गेल्या ११ वर्षांपासून खोटी कथानके रचून पूर्वी श्री विजयादुर्गा देवीचे मंदिर असलेले ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ हे वारसा स्थळ आपल्या ताब्यात घेऊ पहात आहे. ही जागा आम्हाला अयोध्येसारखी असून ती चर्चच्या घशात जाऊ देणार नाही, अशी भूमिका हिंदू रक्षा महाआघाडीने घेतली आहे.

हिंदू रक्षा महाआघाडीच्या वतीने आज (२२ ऑगस्ट) पुरातत्व खात्याचे संचालक निलेश फळदेसाई आणि उपसंचालक दत्तराज गावस देसाई यांची भेट घेतली.

हिंदू रक्षा महाआघाडी लवकरच चर्चसंस्थेच्या वारसा स्थळ ताब्यात घेण्याच्या कारवायांविषयी राज्यस्तरावर जनजागृती करणार आहे. या स्थळाच्या जागृतीसाठी आम्ही लहान पुस्तिकाही छापली आहे. २० हजार पुस्तिका गोव्यात वितरित केल्या जाणार आहेत, अशी माहिती हिंदू रक्षा महाआघाडीचे गोवा प्रमुख प्रा. सुभाष वेलींगकर यांनी दिली.

चर्च संस्थेने या ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून बांधकाम करणे, वडाचे झाड तोडणे, तळी पुरणे, पुरातन मंदिराचे अवशेष भूमीत गाडणे आदी कृती केलेल्या आहेत.

गोवा सरकारच्या पुरातत्व खात्याने गतवर्षी २७ डिसेंबर २०२३ रोजी ,मुरगाव नगरनियोजन प्राधीकरणाच्या अधिकार्‍यांसोबत या वारसा स्थळाचे गल्या ११ वर्षात पहिल्यांदाच संयुक्त सर्वेक्षण केले आहे आणि यातून चर्च संस्थेचे वारसा स्थळी अतिक्रमण केल्याचे उघड झाले आहे. अतिक्रमणाची माहिती आता पहिल्यांदाच सरकारी कागदोपत्री आलेली आहे.

सरकारने तातडीने वारसा स्थळावरील अतिक्रमण हटवावे आणि याठिकाणी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली भूमीचे उत्खनन करून या जागेचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जनतेसमोर आणावा, अशी मागणी हिंदू रक्षा महाआघाडीने केली आहे.

पोर्तुगिजांनी पाडलेल्या मंदिरांचे प्रतिकात्मक मंदिर उभारण्याचा सरकारी प्रस्ताव स्वाभिमानी जनतेला अमान्य आहे. गोव्यात पोर्तुगिजांनी पाडलेल्या मंदिरांचे एकच प्रतिकात्मक मंदिर उभारण्याचा प्रस्ताव आम्हाला अमान्य आहे. हा पलायनवाद आहे आणि स्वाभिमान जनता हे स्वीकारणार नाही, असे प्रा.सुभाष वेलिंगकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI 2024: 'भूमी'चे गोमंतकीयांबद्दल गौरवोद्गार!म्हणाली की, लैंगिक भेदाकडे पाहण्याची दृष्टी...

Goa Crime: पुत्रविरहामुळे व्यथित होऊन 'त्याने' संपवले जीवन! सुसाईड नोटमध्ये केला पत्नी आणि तिच्या प्रियकरावर आरोप; Video मध्ये म्हणाला की...

Goa BJP: भाजप नेत्‍यांना पक्षशिस्‍त पाळण्याच्या सूचना! Cash For Job वर जाहीर वाच्‍यता नको; गाभा समितीच्या बैठकीत घमासान

Rashi Bhavishya 22 November 2024: व्यवसायात चांगला फायदा होईल, प्रेम प्रकरणात यश मिळेल; पण कोणाला?

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

SCROLL FOR NEXT