Goa Railway  Dainik Gomantak
गोवा

Goa Railway: काणकोण येथे रेल्वे गाड्या थांबवण्यासंबंधी लवकरच तोडगा काढू

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Railway: काणकोण रेल्वे स्थानकावर गाड्या थांबवण्याची शिफारस करणारे निवेदन भाजप काणकोण ब्लॉक कमिटीने सभापती रमेश तवडकर यांना सादर केले.

यावेळी आपण लवकरच दिल्लीला जाऊन संबंधित अधिकाऱ्यांशी या विषयी चर्चा करू असे आश्वासन सभापती रमेश तवडकर यांनी दिले.

काही दिवसांपूर्वी काणकोण रेल्वे स्थानकावर कोविड महामारीपूर्वी ज्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या थांबा घेत होत्या त्या रेल्वे गाड्यांना पूर्ववत थांबा द्या, अशी मागणी मान्य करून घेण्यासाठी येथील ज्येष्ठ नागरिकांनी रेल्वे स्थानकावर उपोषणाला सुरुवात केली होती.

ज्येष्ठ नागरिकांनी उपोषणाचा बडगा उचलल्यानंतर काणकोणचे मामलेदार मनोज कोरगावकर यांनी त्याची गंभीर दखल घेत काणकोण रेल्वे स्थानकावर रेल्वेचे अधिकारी सुनील नारकर यांना बोलावले होते.

त्यावेळी नारकर यांनी रेल्वेच्या उच्च अधिकाऱ्यांकडे सदरची बाब पोहिचवली होती. त्यानंतर आता सभापती रमेश तवडकर यांनी आपण लवकरच दिल्लीला जाऊन संबंधित अधिकाऱ्यांशी या विषयी चर्चा करू असे आश्वासन दिलेय.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim News: भाडेकरूंची डिचोली पोलिस स्थानकात गर्दी! कार्यक्षेत्रात तपासणी मोहिमेला वेग

'गोवा पोलिस' अंमलीपदार्थांविरोधी गंभीर! 'कोकेन जप्ती'प्रकरणी दिल्ली पोलिसांना करणार सहकार्य

Quelossim: ही तर नौटंकी! केळशीची बदनामी केल्याचा व्हेंझी यांच्‍यावर सरपंचांचा आरोप

Sunburn Festival 2024: धार्मिक स्थळी 'असले' कार्यक्रम नकोच! 'सनबर्न' साठीच्या सभेनंतर ग्रामस्थ ठरवणार दिशा

Israel-Iran War: इस्रायल-इराण युद्धानं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार! भारतासह जगभरातील देशांना बसणार फटका

SCROLL FOR NEXT