COVID
COVID 
गोवा

खांडोळ्याची मायक्रो कंटेन्मेट झोनकडे वाटचाल

Dainik Gomantak

खांडोळा,

बेतकी-खांडोळ्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे हा परिसर मायक्रो कंटेन्मेट झोन करण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती मंत्री गोविंद गावडे यांनी हळदणवाडा-खांडोळा येथे दिली.
कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढत असल्यामुळे परिसरातील ग्रामस्थ हादरले आहेत. प्रत्येकजण भीतीच्या सावटाखाली आहे. त्यामुळे त्यांच्या मनातील भिती दूर करण्यासाठी आज सरपंच दिलीप नाईक, बेतकीचे आरोग्याधिकारी डॉ. ब्रॅंडा पिंटो, उपजिल्हाधिकारी केदार नाईक, प्रताप वळवईकर, नारायण नाईक, पंच कनक सावंत, अरविंद गावकर, राज नाईक यांनी या भागाचा दौरा केला.
हळदणवाड्यावरील ग्रामस्थांची मंत्री गावडे भेट घेतली. त्यावेळी ते म्हणाले, कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत, म्हणून घाबरू नये. प्रत्येकांने काळजी घेणे आज गरजेचे आहे. जीवनावश्यक सर्व साहित्य या परिसरात उपलब्ध आहे. खांडोळा किंवा माशेल परिसरात फक्त बंद पाळून चालणार नाही, तर नेमकेपणाने आपण आपली व इतरांचीही काळजी घेणे गरजेचे आहे. शक्यतो घरीच राहाणे योग्य आहे. अनावश्यक फिरणे बंद करावे, गरज असेल तरच घराबाहेर पडावे. तसेच मास्कचा वापर करा, सॅनिटायझर वापरा. जे जे करता येईल, ते ते उपाय सरकारतर्फे करण्यात येत आहेत. येथील कोरोनाबाधितांची योग्य केअर सेंटरमध्ये घेण्यात येत आहे. त्याबद्दल काळजी करू नये. काही ग्रामस्थांची टाळेबंदी करण्याची मागणी आहे, परंतु सर्व व्यवहार बंद केल्याने कोरोनाला रोखता येणार नाही. तर या समस्येशी लढले पाहिजे. योग्य प्रकारे आपण मार्गदर्शक तत्वाचे पालन केले तर कोरोनापासून आपण बचाव करू शकतो.
सरपंच दिलीप नाईक म्हणाले, बेतकी-खांडोळा परिसरातून कोणीही बाहेर जाऊ नये, कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम साजरे करू नये. गरज असेल तर घराबाहेर पडावे. डॉ. पिटो यांनीही आरोग्यविषयक माहिती देताना कोरोनापासून आपले संरक्षण कसे करावे, हे सांगितले. ग्रामस्थांत कोरोनाबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी वाड्यावाड्यावर ध्वनिक्षेपकाद्वारे माहिती देण्यात आली. समाजकार्यकर्ते नारायण नाईक यांनी जागृतीसंदर्भात खूपच चांगले प्रयत्न केले. गेले दोन दिवस ते जागृतीचे काम करीत आहेत. प्रत्येक वाड्यावर फिरून त्यांनी काळजी घेण्याचे आवाहन केले. बेतकी-खांडोळा ग्राहक सोसायटीचे चेअरमन प्रताप हळदणकर यांनी कोरोनाबाधितांच्या वाड्यावर घरपोच रेशनचा पुरवठा करावा, असे मंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले.

माशेले बाजारात गर्दी
बेतकी, खांडोळा परिसरात एकूण ३६ रूग्ण असून अद्याप काही जणांचे अहवाल येणे बाकी आहे. याशिवाय माशेल ५, कुंभारजुवे १ असे कोरोनाबाधित आहेत. या पंचक्रोशीत कोरोनाबाधितांचा आकडा ४० च्यावर गेला आहे. त्यामुळे पंचक्रोशीत टाळेबंदी करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे आज माशेल बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी होती. टाळेबंदी जाहिर झाली तर जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होईल, म्हणून बाजारात गर्दी केली होती. प्रत्येका आस्थापनात, दुकानात सामाजिक अंतर पाळून व्यवहार करण्यात येत आहेत. बागायदारमध्येही रांगेत उभे राहून साहित्याची यादी द्यावी लागते, त्यानंतर यादीनुसार साहित्य दिले जाते. त्यामुळे तेथेही गर्दी होती. व्ही. पी. के. बाजारातही अशीच गर्दी होती.

 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Show Cause Notice: सात दिवसांत स्पष्टीकरण द्या! बेकायदा शुल्क आकारणी प्रकरणी मुष्टिफंड हायस्कूलला नोटीस

Kyrgyzstan Violence: किर्गिस्तानमध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला; परराष्ट्र मंत्रालयाकडून भारतीय विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन नंबर जारी

Pakistan Road Accident: पाकिस्तानातील पंजाबमध्ये भीषण अपघात; 5 मुलांसह एकाच कुटुंबातील 13 जणांचा जागीच मृत्यू

Taxi Driver Assault: कळंगुट येथे मद्यधुंद पर्यटकांचा स्थानिक टॅक्सीचालकावर हल्ला, पाचजण ताब्यात

Goa Monsoon 2024: आनंदवार्ता! गोव्यात पाच जूनला मॉन्सून हजेरी लावणार

SCROLL FOR NEXT