Heat wave
Heat wave  Dainik Gomantak
गोवा

प्रशांत महासागरातील उष्ण वाऱ्यामुळे जगभरात उष्णता वाढली; गोवाही घामाघूम; आर्द्रता 94 टक्क्यांवर पोहोचली

Manish Jadhav

राज्यात आज बहुतांश भागात सकाळपासून ढगाळ वातावरण राहिले. आर्द्रता 94 टक्क्यांवर पोहोचली. त्यामुळे उकाड्याने लोक हैराण झाले होते. तत्पूर्वी, पाऊस पडल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची प्रक्रिया सुरु असून, तिथे निर्माण होणाऱ्या वादळाच्या दिशेवर मॉन्सूनचा प्रवास ठरणार आहे. दरम्यान, पृथ्वीच्या मोठ्या भागाला सध्या उष्णतेच्या लाटेला तोंड द्यावे लागत आहे. आशिया आणि दक्षिण आफ्रिकेतील देशांमध्ये त्याची तीव्र झळ जाणवू लागली आहे. बहुतांश ठिकाणी पारा 45 अंशांच्या पलीकडे गेला आहे.

अमेरिकेच्या नॅशनल ओसियानिक अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशनच्या अहवालात ही माहिती आहे. अनेक देशांत रात्रीही उष्णतेच्या लाटा आहेत. प्रशांत महासागरातील उष्ण वाऱ्यामुळेही जगभरात उष्णता आहे. पाकिस्तानच्या जेकोबाबादमध्ये सर्वाधिक 48 अंश तापमान होते.

पाकिस्तानात शाळा बंद!

पाऊस व पुरामुळे हैराण झालेल्या पाकिस्तानात उष्णतेची लाट सुरू आहे. अनेक भागांत तापमानाने अर्धशतक नोंदवले आहे. ते सरासरीहून ८ अंश सेल्सियस जास्त आहे. परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ३१ मे पर्यंत शाळा बंद ठेवल्या आहेत. व्हिएतनाममध्ये तलावांतून मृत मासे आढळून आले.

म्यानमारमध्ये दररोज 40 मृत्यू

म्यानमारला एप्रिलमध्ये उष्णतेची लाट सुरू झाली. अगदी १० मेपर्यंत दररोज ४० जणांचा त्यामुळे मृत्यू झाला. त्यानंतर मोचा वादळाचाही तडाखा बसला. कंबोडियन वाईल्ड लाईफ सेंच्युरीमध्ये तहानेने अनेक जनावरे मृत्यू पावली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Socorro Panchayat Election: सुकूर पंचायत प्रभाग १० मधून सुभाष हळर्णकर यांची सरशी

Emergency: ''इंदिरा गांधींचा आणीबाणी लागू करण्याचा निर्णय, तेव्हा सोनिया गांधी...''; भाजप नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

Goa Congress: पूजा शर्माला अटक करा! गोवा काँग्रेसचा CM सावंत यांना 24 तासांचा अल्टिमेट्म

National Service Scheme : विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचा लाभ घ्यावा : दिलीप धारगळकर

Goa Today's News: विश्वास ठेवा, योग्य तापासाबाबत आम्ही कटिबद्ध आहोत - DGP

SCROLL FOR NEXT