Garbage Vehicle  Dainik Gomantak
गोवा

कचरा संकलनासाठी सांताक्रुझ पंचायतीची फिरती वाहनसेवा

कचरा पॉइंट हद्दपार करून पंचायत कचरामुक्त करण्याचे ध्येय या योजनेखाली ठेवण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: सांताक्रुझ पंचायतीने कचरा गोळा करण्यासाठी फिरती वाहनसेवा सुरू केली आहे. पंचायतीच्या सरपंच सोनू आराउजो, माजी सरपंच मारियानो आराउजो व मान्यवरांच्या उपस्थितीत या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. मिळेल तिथे कचरा टाकून पंचायत क्षेत्रात मोक्याच्या ठिकाणी निर्माण झालेले कचरा पॉइंट हद्दपार करून पंचायत कचरामुक्त करण्याचे ध्येय या योजनेखाली ठेवण्यात आले आहे.

या योजनेंतर्गत कचरा गोळा करणार्‍या वाहनाचे उद्‍घाटन केल्यानंतर सरपंच सोनू आराउजो म्हणाल्या की, पंचायतीकडून घरोघरी कचरा उचल नेहमी केली जाते. मात्र, बऱ्याचदा कचरा कामावर जाणाऱ्या अनेकांना घरोघरी कचरा संकलक कामगारांकडे कचरा देण्यास वेळ मिळत नाही. त्यांना या योजनेखाली उपलब्ध करण्यात येणाऱ्या फिरत्या वाहनामध्ये कचरा देण्याची व्यवस्था करण्यात येईल. ओल्या व सुक्या कचऱ्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पंचायतक्षेत्रात जागा मिळेल तिथे कचरा टाकण्याची लोकांची सवय दूर व्हावी, या उद्देशाने ही सेवा सुरू केली आहे. गरज ओळखून पुढे वाहने वाढवण्यात येतील. घरमालकांनी आपल्या भाडेकरूनांही या सेवेची माहिती द्यावी,असे आवाहन सरपंच सोनू यांनी यावेळी केली.

माजी सरपंच मारियानो आराउजो यांनी सांगितले,की पंचायतक्षेत्रात या फिरत्या वाहनामुळे सर्व कचरा पॉईंट गायब होऊन पंचायत परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत होईल.

वर्गीकरण केलेला ओला व सुका कचरा गोळा करण्यास फिरते वाहन चर्च रस्ता, मंदिराजवळ व ताळगाव रस्त्याच्या शेजारी कचरा टाकण्यात येणाऱ्या जागी राहील, असे सरपंच सोनू यांनी सांगितले. यावेळी पिटू आराउजो, गिल्बर्ट आराउजो, दुर्गेश आदी मान्यवर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fraud: शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने कोट्यवधी लाटले, आरोपी लंडनला फरार; पोलिसांची शोध मोहीम सुरु!

Kulem Gram Sabha: कुळे ग्रामसभा तापली! ऑडिट रिपोर्टवरुन ग्रामस्थांनी सरपंचांना घेरले; मार्केट कॉमप्लेक्सच्या मुद्यावरुन वादंग

Goa Live Updates: शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने कोट्यवधी लाटले!

Anjuna News: गोव्यात संगीत महोत्सवाचा वाद चिघळला, भर सभेत तरुणाला मारहाण; Video Viral

Goa Politics: ''महाराष्ट्रात महायुतीला विजय मिळाला म्हणून गोव्यातील विरोधक...''; सरदेसाईंचा घणाघात

SCROLL FOR NEXT