Vegetables has stop coming from Belgaum to Goa
Vegetables has stop coming from Belgaum to Goa 
गोवा

बेळगावातून गोव्यात येणारा भाजीपाला आजपासून बंद

गोमंन्तक वृत्तसेवा

पणजी: कोविड संचारबंदीच्या(Lockdown) काळात बेळगावाहून(Belgaum) येणारा आणि गोवा फलोत्पादन विकास महामंडळाच्या(Goa Horticulture Development Corporation) दुकानांवर हक्काने उपलब्ध होणारा भाजीपाला आता उपलब्ध होणार नाही. बेळगावातून गोव्यात भाजीपाला येणे बंद होणार आहे. बेळगावातील भाजी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय तेथील व्‍यापाऱ्यांनी घेतल्यामुळे गोव्याला होणारा भाजीपाला(Vegetables) पुरवठा खंडित होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कृषी उत्पन्न बाजार समितीने (APMC) सुरु केलेली सीपीएड मैदान व ऑटोनगर येथील आरटीओ(RTO) मैदानावरील भाजी मार्केट(Vegetables) बंद करून पूर्वीप्रमाणे एपीएमसी आवारात भाजी मार्केट सुरू करण्यास परवानगी द्यावी. जोपर्यंत एपीएमसीत पुन्हा भाजी मार्केट सुरू केले जात नाही, तोपर्यंत भाजी मार्केट बेमुदत काळासाठी बंद करण्यात आले आहे. आज मंगळवारपासूनच याच्या अंमलबजावणीला सुरवात झाली.(Vegetables has stop coming from Belgaum to Goa)

वादाचे कारण?
एपीएमसीतील भाजी मार्केटमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन तेथील प्रशासनाने शहरात दोन ठिकाणी भाजी मार्केट उभारले आहे. मात्र, दोन्ही ठिकाणी आवश्‍यक त्या सुविधा नसल्याने व्यापाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रविवारी झालेल्या वादळी वाऱ्याच्या पावसात गाळ्यांमध्येच पावसाचे पाणी तुंबले होते. भाजीपालाही पावसात भिजल्याने भाजी खराब झाली. याचा फटका शेतकऱ्यांसहीत व्यापाऱ्यांना बसला. वादळी वाऱ्यांमुळे एका शेडवरील पत्रा वाऱ्याने उडून गेला. या घटनेत व्यापारी थोडक्यात वाचला. अन्यथा, मोठी दुर्घटना झाली असती. सीपीएड मैदानातूनही उच्चभारीत विजेची केबल गेली आहे. ती केबलही व्यवसायिकांसाठी धोकादायक आहे.

जिल्‍हाधिकाऱ्यांना निवेदन
एपीएमसीने केलेल्या दोन्ही भाजी मार्केटध्ये सुविधांचा अभाव आहे. रात्री भाजीही चोरीला जाण्याच्या घटना घडत आहेत. एपीएमसीत प्रशस्त जागा असल्याने त्या ठिकाणी आपल्याला आरामात व्यवसाय करता येणार आहे. यामुळे तत्काळ येथील बाजार बंद करून एपीएमसीतच भाजी मार्केट सुरू करावे, अशी मागणीही तेथील भाजी विक्रेत्यांनी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे आज केली आहे. निवेदनाचा स्वीकार करून जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी यासंबंधी एपीएमसी सचिवांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासन दिले. 

सुविधांचा अभाव
एपीएमसीने शहरात दोन ठिकाणी भाजी मार्केट सुरू केले आहे. मात्र, या ठिकाणी सुविधांचा अभाव आहे. पावसामुळे व्यापाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. या दोन्ही भाजी मार्केटचे एपीएमसीत स्थलांतर करेपर्यंत भाजी मार्केट बंद ठेवण्यात येईल. यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. त्यांनी सचिवांबरोबर चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे आश्‍वासन दिले आहे, अशी माहिती बेळगाव जिल्हा भाजीपाला व्यापारी संघाचे सचिव सतीश पाटील यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranbir Alia Video: रणबीरच्या मुंबई सिटीकडून गोव्याचा पराभव, आलियासोबत विजयी जल्लोषाचा व्हिडिओ व्हायरल

Smart City Panaji: स्मार्ट सिटी पणजीच्या खोदकामात आढळली रहस्यमय मूर्ती

Kala Academy: गोविंद गावडे कोणाला वाचवत आहेत? सल्लागाराकडे दाखवले बोट

Economic Crisis: पाकिस्तानचा कैवारी बनणाऱ्या देशाला वाढत्या महागाईनं ग्रासलं; दोन वेळच्या अन्नासाठी जनता करतेय संघर्ष!

Kala Academy Viral Video: मंत्र्यांसारखे कला अकादमीचे लाईट्स रंग बदलतात; राजदीपचा मुख्यमंत्र्यांना इशारा

SCROLL FOR NEXT