Vanarth Foundation  Dainik Gomantak
गोवा

Goa News: खारफुटींचे जतन, संवर्धन करण्यासाठी ‘मॅंग्रो ओडिसी’ कार्यक्रम! जनशिक्षण, सांस्कृतिक उपक्रमांद्वारे जागृती

गोमन्तक डिजिटल टीम

Mangrove Odyssey Conservation Project Vanarth Foundation

पणजी: राज्यातील खारफुटींचे जतन, संवर्धन करण्यासाठी वनअर्थ फाऊंडेशन ही बिगर सरकारी संस्था पुढे सरसावली आहे. महिनाभर चालणारा असा ‘मॅंग्रो ओडिसी’ हा कार्यक्रम त्यांनी हाती घेतला आहे. जनशिक्षण, सांस्कृतिक उपक्रमांद्वारे जागृती केली जाणार आहे.

खारफुटी पाहण्यासाठी सहलींचे आयोजन करणे संस्थेने सुरू केले आहे. ६ ऑक्टोबरपासून या सहली सुरू झाल्या असून दर शनिवारी व रविवारी खारफुटींची माहिती या सहलींत सहभागी जिज्ञासूंना देण्यात येते.

सलीम अली पक्षी अभयारण्य व दिवाडी बेटाचा दौराही यादरम्यान आयोजित करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी निसर्ग वर्गखोल्या यानिमित्ताने तयार केल्या आहेत. खारफुटींना भेट देत अनुभवात्मक शिक्षण देण्यावरही या मोहिमेंतर्गत भर दिला जात आहे. विद्यार्थ्यांना किनारपट्टीच्या परिसंस्थेमध्ये खारफुटीची महत्त्वाची भूमिका समजण्यास मदत व्हावी यासाठीही संस्था कार्यरतआहे.

खारफुटी परिसरात २० ऑक्टोबर रोजी एका अनोख्या कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे. त्यातून खारफुटी संगीत हे शांत आवाज देणारे संगीत निर्माण केले जाणार आहे. दररोजच्या कोलाहालापासून सुटका करणारा हा कार्यक्रम असेल, अशी माहिती संस्थेने दिली आहे.

पुस्तकाचे प्रकाशन

२६ ऑक्टोबर रोजी शेफ मायकल स्वामी हे ‘खारफुटीचे खाद्यपैलू आणि त्यांचे पर्यावरणीय महत्त्व’ यावर प्रात्यक्षिकांसह माहिती देणार आहेत. खारफुटींबाबत १२ छायाचित्रे असलेल्या ‘कॉफी टेबल’ पुस्तकाचे प्रकाशनही यानिमित्ताने केले जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ashish Nehra: आशिष नेहराच्या अडचणीत वाढ; केळशी ग्रामपंचायतीने बजावली नोटीस

CJI Dr. D.Y Chandrachud: आता कोकणीसह मराठीत होणार सुप्रीम कोर्टाच्या निवाड्यांचे अनुवादन; CJI चंद्रचूड यांचं गोव्यात मोठं वक्तव्य

Goa Todays Live Update: गोव्याच्या मुख्य सचिवांची राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या सचिवपदी निवड!

CJI D. Y. Chandrachud: प्रत्येकवेळी गोव्यात आल्यावर खास वाटतं.. CJI चंद्रचूड यांनी देशातील बेस्ट निसर्ग सौंदर्य म्हणत केलं कौतुक

Mumbai Goa Highway: कॅलिफोर्नियासारखा होणार मुंबई - गोवा सुपरहायवे; 26,000 कोटींच्या मरीन महामार्गाचे काम सुरु

SCROLL FOR NEXT