vignesh 1.jpg
vignesh 1.jpg 
गोवा

तेरा वर्षीय विघ्नेशने बनवलं ‘वीज दोष शोध’ यंत्र; जाणून घ्या

गोमंन्तक वृत्तसेवा

फातोर्डा : गोवा राज्य इनोव्हेशन कौन्सिलने (Goa State Innovation Council) 13 वर्षीय विघ्नेश नवसो शेटये (Vighnesh Navaso Shetye) या विद्यार्थ्याला सहाय्यता अनुदान प्रदान केले आहे. विघ्नेशने ‘वीज वाहिन्यातील दोष शोध यंत्रा’चा शोध लावला आहे. जर एखाद्याच्या घरातील वीज खंडित झाली, तर त्या व्यक्तिला फोन करून संबंधीत वीज खात्याला कळविण्याची गरज भासणार नाही, तर या यंत्राद्वारे थेट वीज खात्याला त्याची माहिती मिळेल, अशा प्रकारचे यंत्र विघ्नेशने बनविले आहे.

आज फातोर्डा (Fatorda) येथील डॉन बॉस्को इंजिनियरिंग कॉलेजमधील (Don Bosco College of Engineering) आयडियाथॉन उपक्रम उद्‍घाटनप्रसंगी विघ्नेश उपस्थित होता. तेथेच या प्रतिनिधीने विघ्नेश व त्याच्या पालकांशी संवाद साधला. विघ्नेश साखळी येथील डॉ. के. बी. हेडगेवार हायस्कुलमध्ये आठवीच्या इयत्तेत शिकत असून यापूर्वी त्याला अग्नीरोधक प्रकल्पाला राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय स्पेलिंग स्पर्धेतही सहभागी झाला होता, असे त्याने सांगितले. (Thirteen year old Vignesh made a power fault detection device)

वीज वाहिन्यातील दोष शोधण्याचे यंत्र तयार करण्यास जवळ जवळ सहा महिने लागले व अंदाजे 2 हजार रुपये खर्च आला, असे विघ्नेशने या प्रतिनिधीला सांगितले. हे यंत्र देशातील मोठ्या इलेक्ट्रिकल उत्पादन कंपन्यापर्यंत पोहोचविण्यासाठी त्याने अर्ज केला आहे, अशी माहिती त्यांच्या पालकांनी सांगितली. त्याचे पालक नवसो शेट्ये (वडिल) व संजना शेटये (आई) दोघेही सरकारी हायस्कुलमध्ये शिक्षक आहेत. 

आपल्याला संगणक अभियंता बनून नंतर आयएएस पदवी संपादन करायची आहे. हे यंत्र बनविताना आपल्याला पालकांचे प्रोत्साहन मिळाले  असेही विघ्नेशने सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress : निष्ठावंत कार्यकर्ते, प्रतिनिधींची वानवा; काँग्रेसची मोठी पंचाईत

Bicholim News : गोव्याच्या अस्तित्वासाठी झटणार : ॲड. रमाकांत खलप

Karnataka Sex Scandal Case : कर्नाटकातील सेक्स स्कँडल प्रकरणाचा गोव्यावर परिणाम नाही : सदानंद तानावडे

Goa Today's Live News: इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर किमान 10-15 राज्यातील सरकार कोसळतील - पवन खेरा

India Canada Relations: जस्टिन ट्रुडोचे पुन्हा बरळले, आम्ही खलिस्तानसोबत आहोत; भारतासोबतच्या संबंधांवर काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT