Thermal scanning of passengers arriving at Daboli Airport will be done
Thermal scanning of passengers arriving at Daboli Airport will be done 
गोवा

परराज्‍यातून गोव्यात येणाऱ्या प्रत्‍येकाची होणार थर्मल तपासणी

दैनिक गोमंतक

पणजी : दाबोळी विमानतळावर आणि राज्यातील रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या प्रवाशांचे आता थर्मल स्कॅनिंग करण्यात येणार आहे. राज्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या स्कॅनिंगच्या प्रक्रियेतून जावे लागणार आहे. कोरोना पडताळणी चाचणीसाठी दोन हजार रुपये आकारण्‍यात येतील. ज्यांना स्वतःची चाचणी करून घेण्याची इच्छा आहे, त्यांनी ही चाचणी करून घेण्यासाठी दोन हजार रुपये भरावे लागणार आहेत. तपासणी अहवाल देण्याची प्रक्रिया ‘एसओपी’नुसार देण्यात येणार आहे. ही प्रक्रिया आजपासून सुरू होणार असल्याची माहिती सरकारने दिली आहे.


दरम्यान राज्यात अनेक पर्यटक असून ते काही दिवसांपासून चाचण्या करण्यासाठी फिरत आहेत. तसेच ज्यांना गोव्यात यायचे आहे, त्यांनाही यामुळे सुविधा होणार असल्याचे आरोग्य खात्याचे म्हणणे आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात प्रवासाच्या उद्देशाने ‘आरटीपीसीआर’ कोरोना चाचणी केली जाणार नाही. मात्र, राज्यातील दक्षिण आणि उत्तर गोव्यातील जिल्हा इस्पितळांमध्ये कोरोना पडताळणी चाचणी सशुल्क करता येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली आहे.


 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रोदा 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT