Chief Minister Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Logistics Park in Goa: गोव्यातील पहिल्या ‘लॉजिस्टिक पार्क’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन; गोमंतकीयांच्या फायद्यासाठी...

गोमन्तक डिजिटल टीम

राज्यात विविध प्रकारचे उद्योग सुरू करण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे. राज्यात लॉजिस्टिक उद्योग वाढणार आहे. त्याचा गोमंतकीयांना फायदा व्हावा यासाठी सरकार लॉजिस्टिक धोरण पुढे नेण्यासाठी योग्य पावले उचलणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

राज्य सरकारने ‘जीआयडीसी’अंतर्गत लॉजिस्टिक धोरण लागू केल्यानंतर राज्यात नुकतेच पहिल्या ‘लॉजिस्टिक पार्क’चे उद्‌घाटन करण्यात आले. उपासनगर येथे उभारण्यात आलेल्या ‘एनडीआर वरामा लॉजिस्टिक पार्क वेअर हाऊस आणि लॉजिस्टिक’ सुविधेचे मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. व्यवस्थापनाकडून दुसऱ्या टप्प्यात आणखीन एक वेअरहाऊस आणि लॉजिस्टिक सुविधा उपलब्ध होणार आहे. त्याची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी झाली.

यावेळी मुख्यमंत्री सावंत यांच्यासमवेत केंद्रीय वीज आणि अक्षय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, आमदार आलेक्स रेजिनाल्ड, कुठ्ठाळीचे आमदार आंतोन वाझ, ‘एमडीआर’चे व्यवस्थापकीय संचालक अमृतेश रेड्डी, ‘एमडीआर’चे सीईओ कृष्णन अय्यर, वरामा लॉजिस्टिकचे जगदीश भानुशाली व इतर मान्यवर उपस्थित होते.

डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

राज्य सरकारने २०२३ मध्ये लॉजिस्टिक धोरण अमलात आणल्यानंतर राज्यात या पहिल्या ‘लॉजिस्टिक पार्क’चे उद्‌घाटन होत आहे. भविष्यात हा उद्योग राज्यात मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. या सुविधेमुळे वेर्णा औद्योगिक क्षेत्रात आणि जवळपासच्या फार्मा आणि एक्सपोर्ट व्यवसायात असलेल्यांना मोठा फायदा होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sand Mining: गोव्यात बांधकामांना आता 'अच्छे दिन' 'मांडवी', 'झुआरी'त रेती उपशास मुभा; दरावरही येणार नियंत्रण

Goa News: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्प्रिंगबोर्ड टॅबलेटचे वाटप

Goa Today's News Live: दिवाळी आधी 'या' कंदब कंडक्टरांना कायमस्वरुपी नोकऱ्या : तुयेकर

सुभाष वेलिंगकरांना अटक होणार का? गोव्यात कॅथलिक समाज आक्रमक, पोलिस स्थानकांवर निदर्शने

Mhadei Water Dispute: कर्नाटककडून पाणी वळविण्याचे काम पुन्हा सुरू, प्रमोद सावंतांना म्हादईपेक्षा खुर्चीची जास्त चिंता; युरी आलेमाव

SCROLL FOR NEXT