Goa Crime Theft  Dainik Gomantak
गोवा

Mapusa Crime: '... अन् त्या फोटोमुळे चोरीचा उलगडा' म्हापशातील नास्नोडकर ज्वेलर्स चोरीप्रकरणी संशयिताच्या आवळल्या मुसक्या!

गोमन्तक डिजिटल टीम

सतर्कतेमुळे पुढे होणारे अनेक अनर्थ टाळता येतात. असेच प्रसंगावधान म्हापशातील नास्नोडकर ज्वेलर्स चोरीप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक विशाल कुट्टीकर यांनी दाखविल्याने या प्रकरणाचा तपास करणे सोपे झाले आणि अल्प कालावधीत संशयितांच्या मुसक्या आवळणे शक्य झाले.

१५ सप्टेंबर रोजी या टोळीतील तिघेजण राजस्थानहून गोव्यात दाखल झाले. चोरी करण्यापूर्वी तिघाही संशयितांनी पर्यटनाचा आनंद लुटला. यात दोन अल्पवयीन (१७ वर्षीय) आणि हरजी चव्हाण (वय २६ वर्षे) यांचा समावेश होता. तर भवानी सिंग (वय १८ वर्षे) हा राजस्थानमध्येच होता. तो फोनवरून या साथीदारांच्या संपर्कात राहून त्यांना मार्गदर्शन करीत होता. कालांतराने चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यावेळी सीसीटीव्ही फुटेज आणि कुट्टीकर यांनी त्या रात्री गस्तीवेळी काढलेल्या फोटोंच्या माध्यमातून संशयितांची ओळख पटवली. मोबाईल लोकेशनवरून पोलिसांनी संशयितांचा माग काढला.

चोरी केल्यानंतर २३ रोजी पहाटे संशयितांनी थिवी रेल्वे स्थानकावरून नेत्रावळी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण केले. तेथे रेल्वे बदलून पुढे राजस्थानकडे निघाले. यावेळी गोवा पोलिस राजस्थानच्या दिशेने येत असल्याची कुणकुण संशयितांना लागली. भवानी सिंगलाही याची चाहुल लागताच त्याने तिघा साथीदारांना राजस्थान येण्याआधीच रेल्वेतून उतरण्यास सांगितले. त्यानंतर भवानी या संशयितांना घेऊन पुन्हा माघारी गोव्याच्या दिशेने येऊ लागला. त्यावेळी कुडाळ येथे पोलिसांनी त्यांना गाठले.

...अन् ते छायाचित्र आले कामी

चोरी केल्यानंतर दोघेही अल्पवयीन म्हापशात फिरताना पोलिस उपनिरीक्षक विशाल कुट्टीकर यांना उत्तररात्री दिसले. यावेळी संशयितांनी आपण पर्यटक असून, गोव्यात फिरण्यासाठी आल्याचे सांगितले. टॅक्सी शोधत असल्याचे त्यांनी भासविले. यावेळी कुट्टीकर यांनी संशयितांचा आपल्या मोबाईलवर फोटो काढून ठेवला आणि इतक्या रात्री कुठेही फिरू नका, असे बजावले.

कोटींचा मुद्देमाल जप्त

संशयित हरजी चव्हाण आणि भवानी सिंग यांना म्हापसा न्यायालयाने शुक्रवारी दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. चोरीला गेलेले सुमारे एक कोटीहून अधिक किमतीचे १ किलो सोने आणि १० किलो चांदीचे दागिने या चोरांकडून जप्त केल्याची माहिती पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिली.

म्हापसा बाजारपेठेतील चंद्रमोहन नास्नोडकर यांच्या मालकीचे ‘नास्नोडकर ज्वेलर्स’ या सराफी दुकानात झालेल्या चोरी प्रकरणातील दोन बालगुन्हेगारांना सिंधुदुर्गातून तर इतर दोघांना अजमेर (राजस्थान) येथून अटक केली. चोरीला गेलेले सुमारे एक कोटीहून अधिक किंमतीचे १ किलो सोन्याचे व १२ किलो चांदीचे दागिने या चोरट्यांकडून जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक अक्षक कौशल यांनी दिली.

म्हापसा पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे हार्जी पूनम सिंग चौहान (२६) व भवानी हिरा सिंग (१८) असून हे दोघे तसेच दोघे बाल गुन्हेगार हे राजस्थानमधील अजमेर येथील कृष्णनापुरा - ली कंकर गावातील आहेत. ते चोरी करून रेल्वेमधून अजमेरला जाण्यासाठी प्रवास करत होते त्यापूर्वीच पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान व सीसी टीव्ही कॅमेऱ्यांच्या सहाय्याने त्यांना गजाआड केले. बाल गुन्हेगारांची रवानगी ‘अपना घर’मध्ये केली आहे.

कारवाईत सहभाग

या कारवाईत उपअधीक्षक संदेश चोडणकर, निरीक्षक निखिल पालेकर, उपनिरीक्षक यशवंत मांद्रेकर, उपनिरीक्षक अजय धुरी, उपनिरीक्षक बाबलो परब, उपनिरीक्षक सुभाष गावकर, उपनिरीक्षक विशाल कुट्टीकर, हेड कॉन्स्टेबल सुशांत चोपडेकर, अल्विटो डिमेलो, शिवाजी शेटकर, कॉन्स्टेबल प्रकाश पोळेकर, तुकाराम कांबळी व इतरांचा समावेश होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

MP Viriato Fernandes: गोवा आणि गोमंतकीयांसाठी अभिमानाचा क्षण! देशाच्या संरक्षण समितीवर कॅ.विरियातो फर्नांडिसांची नियुक्ती

Goa Politics: 'मुख्यमंत्री महोदय 2 लाख नोकऱ्यांबाबत तपशीलवार माहिती द्या...'; कॉंग्रेसचा हल्लाबोल

SGPDA Market: मांस विक्रेत्यांना ‘एसजीपीडीए’ खुले; गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली मान्यता

Indian Super League: हेर्रेराची हॅटट्रिक एफसी गोवासाठी ठरली 'निर्णायक'; ईस्ट बंगालला चारली पराभवाची धूळ!

Goa Crime: ओडिशातून गोव्‍यात गांजा तस्‍करी करणाऱ्या संशयितास जामीन मंजूर! गोव्‍याबाहेर जाण्यास मनाई

SCROLL FOR NEXT