suchana seth Dainik Gomantak
गोवा

Mapusa News : 12 तासांच्या प्रवासात सूचना होती संवेदनशून्य

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa News : म्हापसा, जन्मदात्या आईनेच चार वर्षीय मुलाचा खून केल्याच्या घटनेने सध्या संपूर्ण देश हादरला आहे. ज्या कॅबमधून सूचना बंगळुरूला चालली होती, त्या कॅबमधून तिने जवळपास १२ तास प्रवास केला.

यावेळी तिच्या चेहऱ्यावर किंचितही ताण, पश्चात्ताप किंवा आपण कुणाचाही तरी जीव घेतलाय, याचा लवलेशही नव्हता. या १२ तासांच्या प्रवासात ती पूर्णतः संवेदनशून्य दिसली, असे या कॅबचा चालक रेजॉन डिसोझा याने ‘गोमन्तक’ला

सूचना ज्या कॅबमधून बंगळुरूकडे जात होती, त्या गाडीच्या डिकीत रक्ताळलेल्या कपड्याच्या बॅगेमध्ये पोलिसांना एक चिठी सापडली आहे. ही चिठ्ठी म्हणजे टीश्‍यू पेपर असून तो फाटलेल्या अवस्थेत होता.

पोलिसांनी तो जोडून त्यावरील मजकूर वाचला. त्या अनुषंगाने पोलिसांची तपासाची दिशा पुढे सरकत आहे. या मजकुरावर सूचनाने मुलाच्या कस्टडीबाबत तसेच तिचे व पती व्यंकटरमणमधील नात्याबाबत लिहिले आहे.

सूचनाने दिला पोलिसांना जबाब!

सूचनाने पोलिसांना जबाब दिला असून घटनेच्या दिवशी आपण झोपी गेले होते, त्यामुळे चिन्मयचा मृत्यू कसा झाला याची आपल्यास कल्पना नाही, असे ती म्हणाली.

विशेष म्हणजे, सूचनाने कुटुंबीयांना सांगितले होते की, तिचा मुलगा हा पती व्यंकटरमण याच्यासारखाच दिसतो.त्याचं तोंड पाहिलं की नेहमी त्यांच्या बिघडलेल्या नात्याची आठवण होते.

दिलेल्या विशेष मुलाखतीवेळी सांगितले. रेजॉन हा या खून प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार आहे.

रेजॉन पुढे सांगतो की, मला रविवारी उत्तररात्री सिकेरीमधील हॉटेल व्यवस्थापनाचा कॉल आला की, अर्जंट एका महिला गेस्टला बंगळुरूला सोडायचे आहे. मात्र, आधीच मी कामावरून थकून परतल्याने मला भाडे स्वीकारायचे नव्हते.

त्यामुळे मी थोडे वाढीव भाडे सांगितले, जेणेकरून गेस्ट स्वतःहून नकार देईल. परंतु, गेस्टने अजिबात आढेवेढे न घेता सांगितलेल्या रकमेला होकार दिला. त्यामुळे मला नाईलाजास्तव बंगळुरूचे हे भाडे स्वीकारणे भाग पडले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

Indian Super League: FC Goa च्या कामगिरीवर प्रशिक्षक मार्केझ भडकले; जमशेदपूर विरोधात पराभवाचे कारणही केले स्पष्ट

Eco Green Cement: 'इको ग्रीन सिमेंट' ठरणार बांधकाम क्षेत्रासाठी वरदान; विद्यार्थ्यांचा क्रांतिकारक प्रकल्प

SCROLL FOR NEXT