पणजी: सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या पवित्र अवशेषांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानावरून डिचोली पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या चौकशीवेळी दोनवेळा संशयित प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी निर्देशाचे पालन करून व उपस्थिती लावून तपासात सहकार्य केले आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले असून तूर्त त्यांची चौकशी संपल्यात जमा आहे. उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाने नोंदविलेली निरीक्षणे अवाजवी ठरविली आहेत.
पोलिस तपासात सहकार्य केल्यामुळे त्यांना अटक करण्याचा प्रश्नच येत नसल्याचे निरीक्षण नोंदवत अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या त्यांच्या अर्जासह इतरांनी सादर केलेले विरोधी हस्तक्षेप अर्जही मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने निकालात काढले. त्यामुळे वेलिंगकर यांना या प्रकरणात अटकेपासून कायमचा दिलासा मिळाला आहे.
वेलिंगकर हे पोलिसांनी बजावलेल्या नोटिसीनुसार १० व११ ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी हजर राहिले.
त्यांनी चौकशीवेळी तपासात सहकार्य केले. त्यामुळे पोलिसही त्यांनी केलेल्या सहकार्याबाबत समाधानी असून तूर्त तरी त्यांची चौकशी संपली आहे.
या प्रकऱणातील साक्षीदार तसेच त्यांच्याविरुद्ध दाखल केलेले तक्रारदार तसेच हस्तक्षेप अर्जदारांच्या जबान्या नोंदवण्यात येतील.
या जबान्या नोंद झाल्यानंतर गरज भासल्यास वेलिंगकर यांना नोटीस बजावून चौकशीसाठी बोलाविले जाईल.
त्यामुळे वेलिंगकर यांना या प्रकरणात अटक केली जाणार नाही, अशी बाजू सरकारी वकिलांनी मांडली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.